Krushik Exhibition : ‘कृषिक २०२३’ प्रदर्शनाला बारामतीत उत्साहात प्रारंभ

शारदानगर येथे अॅग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित, कृषी विज्ञान केंद्र, अटल इनक्युबेशन सेंटर आयोजित १७० एकर वरील ‘कृषिक-२०२३’ कृषी प्रदर्शनास गुरुवार (ता. १९)पासून उत्साहात प्रारंभ झाला.
Ajit Pawar
Ajit PawarAgrowon

माळेगाव, जि. पुणे : शारदानगर येथे अॅग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट (Agriculture Development Trust) संचलित, कृषी विज्ञान केंद्र, अटल इनक्युबेशन सेंटर (Atal Incubation Center) आयोजित १७० एकर वरील ‘कृषिक-२०२३’ कृषी प्रदर्शनास (Krushik Agrriculture Exhibition) गुरुवार (ता. १९)पासून उत्साहात प्रारंभ झाला. या प्रसंगी कृषिमंत्री अब्दूल सत्तार, विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar), राजेंद्र पवार (Rajendra Pawar), सुनंदा पवार उपस्थित होते.

Ajit Pawar
Agrowon Exhibition : सोयाबीन-कापूस उत्पादकांसाठी आधुनिक तंत्रज्ञान

प्रदर्शनामध्ये १७० एकर क्षेत्रावर विविध प्रकारचे प्रयोगशील शेती प्लॉट, निर्यातक्षम पालेभाज्या व फळबागा, मशागतीची अवजारे, आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे तयार केलेल्या मशनरींपासून ते मिनी रोबो ट्रॅक्टरपर्यंत सर्व काही एकाच ठिकाणी शेतकऱ्यांना पाहावयास मिळत आहे.

या प्रसंगी बोलताना कृषिमंत्री सत्तार म्हणाले, ‘‘शेतीमध्ये आगामी काळात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर वाढणार आहे. ड्रोन तंत्रज्ञान, मिनी रोबो ट्रॅक्टर ही त्याची उत्तम उदाहरणे आहेत. त्यामुळे कमी खर्चात अधिक उत्पन्न मिळविण्यासाठी या आधुनिक तंत्रज्ञानाला अधिकाधिक प्रोत्साहन देण्याचा शासनस्तरावर प्रयत्न आहे.’’

Ajit Pawar
Agrowon Agricultural Exhibition 2023 : मराठवड्यातील कोरडवाहूतला आशादायी स्पार्क

प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी शेतकऱ्यांची उपस्थिती उल्लेखनीय होती. त्यांनी शेतीमधील ज्ञान-तंत्रज्ञानाची माहिती घेतली. पुणे, नगर, नाशिक, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यांतून शेतकरी आले होते.

यानिमित्त झालेल्या कार्यक्रमात विश्‍वस्त रणजित पवार, विष्णूपंत हिंगणे, राजेंद्र देशपांडे, डॉ. मगर, सीईओ नीलेश नलावडे यांनी स्वागत केले. प्रदर्शन सोमवार (ता. २३)पर्यंत शेतकऱ्यांसाठी खुले राहणार आहे.

‘कृषितंत्राने भारविणारे कृषिक प्रदर्शन’

विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले, ‘‘शेतीच्या प्रात्याक्षिकांपासून कंपन्यांच्या तंत्रज्ञानापर्यंत आणि जनावरांच्या प्रदर्शनापासून भीमथडी जत्रेपर्यंत, बारामती कृषी विज्ञान केंद्रातील ‘कृषिक’ने हजारो शेतकऱ्यांची गर्दी खेचली आहे.

आधुनिक अवजारे व मशिनरी, पीक प्रात्यक्षिकांबाबत शेतकऱ्यांमध्ये उत्सुकता आहे. त्यामुळे बारामतीचे कृषी प्रदर्शन खरेतर देशभर दाखविण्याची गरज आहे.’’

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com