
Rural Development News सिंधुदुर्गनगरी ः शोषखड्डा मोहिमेमध्ये (Shoshkhadda) कुडाळ पंचायत समिती (Kudal Panchayat Samiti) राज्यात सर्वोकृष्ट ठरली आहे. राज्यामध्ये २३ हजार २९१ शोषखड्ड्यांमध्ये एकमेव कुडाळ तालुक्यात ९ हजार ३१७ असे सर्वाधिक शोषखड्डे करण्यात आले. या पुरस्काराचे वितरण शुक्रवारी (ता. ३) मुंबईत होणार आहे.
कुडाळ पंचायत समितीने कोविड कालावधीत सुद्धा ग्रामपंचायत, तालुका व जिल्हा स्तरावर वैशिष्ट्यपूर्ण काम करताना गेली तीन वर्षे ‘माझं घर माझा शोषखड्डा’ अभियान राबविले.
कुटुंबाला रोजीरोटी मिळावी म्हणून कुडाळ तालुक्यात ९३१७ शोषखड्डे पूर्ण करून प्रत्येक शोषखड्ड्यामागे एका कुटुंबास २,५५७ रुपये अनुदान मिळाले.
राज्यामधील एकूण २३,२९१ शोषखड्ड्यांपैकी ९,३१७ शोषखड्डे कुडाळ तालुक्याने पूर्ण केले. या वैशिष्ट्यपूर्ण आणि स्तुत्य उपक्रमाची राज्याने दखल घेतली आहे. येथील पंचायत समितीचे प्रशासक तथा गटविकास अधिकारी विजय चव्हाण व सहायक प्रशासन अधिकारी चंद्रशेखर माळकर यांना निमंत्रित केले असून त्यांचा गौरव होणार आहे.
फळझाड लागवडीत देखील या पंचायत समिती ने उल्लेखनीय काम केले आहे. ११६९.८९ हेक्टर एवढी जमीन लागवडीखाली आणली आहे. सामाजिक वनीकरण, विहिरी, गोठे, अंगणवाडी या विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य केलेल्यांचा सत्कार होणार आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड या कोकण विभागात कुडाळ पंचायत समितीने बाजी मारली आहे.
पंचायत समितीच्या माध्यमातून लोकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. यापूर्वी गटविकास अधिकारी चव्हाण हे देवगड येथे कार्यरत असताना हा तालुका जिल्ह्यात अग्रेसर होता. कोरोना कालावधीत पुरेसा कर्मचारी वर्ग नसताना सुद्धा ही कार्यपद्धती राबविण्यात आली.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.