
महाड : अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागण्यांचा पाठपुरावा करण्यासाठी तसेच समाज संघटना मजबूत करण्याकरता कोकणातील कुणबी समाज (Kunabi Community) एकवटला असून महाड तालुक्यातील सुमारे बारा हजार बांधवांनी एकत्र येत अभियानाची सुरुवात केली.
रत्नागिरीतून कोकणातील कुणबी जोडो अभियानाची (Kunabi Jodo Abhiyan) डिसेंबर २०२२ मध्ये सुरुवात झाली.
कुणबी समाजोन्नती संघाचे अध्यक्ष भूषण बरे यांच्या प्रमुख नेतृत्त्वाखाली, कुणबी राजकीय संघटन समिती अध्यक्ष अशोक वालम यांच्या प्रयत्नातून रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे, पालघर, मुंबई, उपनगर क्षेत्र, नवी मुंबईत कुणबी जोडो अभियान राबविले जात आहे.
मुंबईतील कुणबी समाजोन्नती संघ या शतकोत्तरी वाटचाल केलेल्या मातृसंस्थेच्या वतीने ८ जानेवारीला महाड व पोलादपूर तालुक्यातील सुमारे बारा हजार कुणबी समाजबांधव एकत्र आले होते.
रायगड जिल्ह्याच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड येथील राजमाता जिजाऊ यांच्या पुतळ्यास अभिवादन करून रॅली काढण्यात आली. माजी आमदार शांताराम फिलसे यांच्या जन्मभूमी चिंभावे गावी तालुकास्तरीय कुणबी जोडो अभियान रॅलीचा समारोप झाला.
कुणबी समाजोन्नती संघातर्फे रायगड जिल्ह्यातील सर्व तालुका शाखांच्या वतीने १० जानेवारी - म्हसळा, ११ जानेवारी - श्रीवर्धन, १२ जानेवारी - तळा, १३ जानेवारी - रोहा, १४ जानेवारी - मुरूड, अलिबाग, १५ जानेवारी - पेण, उरण, कर्जत, खालापूर, पाली येथे कुणबी जोडो अभियान राबवले जाणार असून पनवेल येथे समारोप होईल.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.