नारायणपूरचे कृषी विज्ञान केंद्र दर्जात्मक वाढीसह बाजारपेठ देणारे

शेतीमालाचे उत्पादन ते विक्री व्यवस्था निर्माण करून देणारे नारायणगाव येथील कृषी विज्ञान केंद्र भारतातील पहिले कृषी विज्ञान केंद्र आहे, असे मत ‘आयसीएआर’ अटारीचे संचालक डॉ. लाखन सिंग यांनी व्यक्त केले.
Agriculture
AgricultureAgrowon

नारायणगाव, ता. जुन्नर ः शेतीमालाचे उत्पादन (Agriculture Production) ते विक्री व्यवस्था निर्माण करून देणारे नारायणगाव येथील कृषी विज्ञान केंद्र (Narayangaon KVK) भारतातील पहिले कृषी विज्ञान केंद्र आहे, असे मत ‘आयसीएआर’ अटारीचे संचालक डॉ. लाखन सिंग (Dr. Lakhan Singh) यांनी व्यक्त केले.

ग्रामोन्नती मंडळ कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव, ॲमेझॉन रिटेल इंडिया प्रा. लि., महाराष्ट्र ॲग्री बिझनेस नेटवर्क प्रोजेक्ट (मॅग्नेट) यांच्या वतीने भेंडी पिकासाठी उत्तम कृषी पद्धती, पीक आरोग्य, गुणवत्ता निर्धारण आणि भाजीपाला विपणन या विषयांवर शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन नारायणगाव येथे करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या उद्‌घाटनप्रसंगी डॉ. लाखन सिंग बोलत होते.

Agriculture
Cotton Rate : कापसाची सीतादई पुजा

या वेळी कृषी विज्ञान केंद्राचे अध्यक्ष अनिल मेहेर, ग्रामोन्नती मंडळाचे अध्यक्ष प्रकाश पाटे, ॲमेझॉन रिटेल इंडिया कंपनीचे प्रॉडक्ट लीडर सिद्धार्थ टाटा, सुमंत्रा मुखर्जी, ॲमेझॉनचे कृषी नियमक विभागचे व्यवस्थापक डॉ. शशीन शोभणे, पुणेचे मॅग्नेट प्रकल्प व्यवस्थापक ग्रँट थॉरटॉन रावसाहेब बेंद्रे, प्रोग्रॅम मॅनेजर स्वाती नायक, अक्षय भाटिया, ‘केव्हीके’चे प्रमुख डॉ. प्रशांत शेटे, शास्त्रज्ञ राहुल घाडगे, भरत टेमकर, डॉ. दत्तात्रेय गावडे, योगेश यादव, धनेश पडवळ आदी उपस्थित होते.

Agriculture
Soybean Production : सोयाबीनचे उत्पादन यंदा घटणार

डॉ. लाखन सिंग म्हणाले, ‘‘पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे उत्पादन वाढविण्यासाठी विविध प्रकल्प राबविले जात आहेत. नारायणगाव येथील हे कृषी विज्ञान केंद्र शेतकऱ्यांच्या दर्जात्मक उत्पादन वाढीसोबत विविध पिकांच्या मूल्यसाखळ्या विकसित करणे व त्या माध्यमातून बाजारपेठ निर्माण करून देण्यासाठी ॲमेझॉन आणि महाराष्ट्र ॲग्री बिझनेस नेटवर्क प्रकल्प (मॅग्नेट) यांच्या सोबत सामंजस्य करार केला आहे. परिणामी, या प्रकल्पाचा फायदा शेतकऱ्यांच्या शेतीमालाला अधिकचे दर मिळण्याकरिता होणार आहे.’’

केव्हीकेचे अध्यक्ष मेहेर म्हणाले, ‘‘शेतकऱ्यांना उत्पादन तंत्रज्ञानासोबत मार्केटिंगच्या वाटा निर्माण करून देण्यासाठी भेंडी, मिरची, शेवंती, केळी, पेरू, सीताफळ, शेवंती आदी पिकांची मूल्यसाखळी विकसित करण्यासाठी प्रशिक्षण देणार आहोत.’’

सिद्धार्थ टाटा म्हणाले, ‘‘प्रशिक्षणाच्या माध्यमातून पिकांच्या उत्पादनाच्या गुणवत्तेत वाढ करणे, शेतकऱ्यांच्या शेतावर पीक प्रात्यक्षिके राबविणे, डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून कृषी सल्ला आणि सेवा प्रदान करणे या पद्धतीचा पायलट प्रकल्प राबविला जात आहे. यासाठी केव्हीकेसोबत करार केला आहे.’’ या वेळी भरत टेमकर यांनी भेंडी पिकातील चांगल्या कृषी पद्धतींचा अवलंब या विषयावर तर डॉ. शशीन शोभणे यांनी भाजीपाला पिकातील अन्न सुरक्षा या विषयावर तांत्रिक मार्गदर्शन केले. रावसाहेब बेंद्रे यांनी मॅग्नेट प्रकल्पाविषयी माहिती दिली. सूत्रसंचालन राहुल घाडगे यांनी केले. आभार डॉ. प्रशांत शेटे यांनी मानले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com