PM Kisan : पीएम किसान योजनेत ९९ हजार शेतकऱ्यांचे ‘केवायसी’ अपूर्णच

पी. एम. किसान योजनेत आतापर्यंत ३ लाख ७० हजार ९२७ शेतकऱ्यांनी ‘केवायसी’ सादर केले आहे. त्यांना योजनेतील मदतीचा हप्ता जमा झाला आहे.
PM Kisan Yojna News
PM Kisan Yojna NewsAgrowon

जळगाव ः पी. एम. किसान योजनेत (PM Kisan Yojana) आतापर्यंत ३ लाख ७० हजार ९२७ शेतकऱ्यांनी ‘केवायसी’ (PM Kisan e KYC) सादर केले आहे. त्यांना योजनेतील मदतीचा हप्ता जमा झाला आहे. मात्र अद्यापही ९९ हजार ५२८ शेतकऱ्यांनी केवायसी सादर केले नाही. त्यांनी ते ऑनलाईनरीत्या लवकर सादर करावे, त्याशिवाय त्यांना मदतीचा निधी मिळणार नाही, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांनी दिली.

७ सप्टेंबर ही केवायसी सादर करण्याची शेवटची तारीख होती. संबंधित विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमन यांनी शेतकऱ्यांना त्याबाबत समज द्यावी, जिल्हा उपनिबंधकांनीही त्यांच्या स्तरावर विकाससोसायट्यांना तसे सूचित करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी मागेच दिलेल्या आहेत.

PM Kisan Yojna News
PM Kisan: देवेंद्र फडणवीसांनी अब्दुल सत्तारांना झापलं ?

केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) योजना ही शासनाची महत्त्वाकांक्षी योजना असून, या योजनेमार्फत शेतकरी बांधवांना प्रतिहप्ता दोन हजार इतके अनुदान वाटप केले जाते. या योजनेचा लाभ मिळण्यासाठी यापुढे शेतकऱ्यांनी ई-केवायसी करणे बंधनकारक केले आहे.

PM Kisan Yojna News
PM Kisan : नको म्हटलं, तरी पीएम किसान सन्मान निधी घ्याच.

ई-केवायसी पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांनाच केंद्र शासनाकडून १२ वा हप्ता वितरित केला जाणार आहे. शेतकऱ्यांना ई-केवायसी स्वतः मोबाईलवरून अथवा जवळच्या ग्राहक सेवा केंद्रावर (सीएससी केंद्र) जाऊन करता येईल. ग्राहक सेवा केंद्रावर ई-केवायसी दरप्रती बायोमॅक्ट्रिक १५ रुपये केंद्र शासनाकडून निश्‍चित करण्यात आला आहे. लाभार्थी यांनी स्वतः मोबाईलव्दारे ई-केवायसी करण्याबाबतची कार्यपद्धती यासोबत जोडून पाठविण्यात आली आहे.

केवायसी बंधनकारक...

एकूण ४ लाख ७० हजार शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेची मदत दिली जाते. आता केवायसी केल्याशिवाय मदत न देण्याचा केंद्राचा निर्णय आहे. आतापर्यंत ३ लाख ७० हजार ९२७ शेतकऱ्यांनी केवायसी सादर केली. ९९ हजार ५२८ अद्यापही बाकी आहे. त्यांनी केवायसी लवकर सादर करावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी पाटील यांनी केले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com