Weather Update : प्रशांत महासागरातील ला निना स्थिती वर्षाअखेरपर्यंत राहणार

पूर्व आणि मध्य प्रशांत महासागरातील पाण्याचा पृष्ठभाग मोठ्या प्रमाणात थंड असून, ला-निना स्थिती तयार झाली आहे. त्यामुळे गेल्या काही आठवड्यांमध्ये व्यापारी वाऱ्यांचे प्रवाह वाढले असल्याचे जागतिक हवामान संघटनेने म्हटले आहे.
Weather Update
Weather Update Agrowon

जिनेवा (वृत्तसंस्था) : विषुववृत्तीय प्रशांत महासागरातील ला निना (La Nina) स्थिती या वर्षाअखेरपर्यंत टिकून राहण्याचे भाकीत संयुक्त राष्ट्र हवामान संस्थेने केले आहे. सलग तीन वर्षे ला-निना स्थिती राहण्याची घटना या शतकात प्रथमच घडत असून, त्यामुळे जगभरात दुष्काळ (Drought) आणि पूर (Flood) सारख्या आपत्तींना तोंड द्यावे लागत आहे.

Weather Update
Rain : जिल्ह्यातील सोळा धरणे तुडुंब

पूर्व आणि मध्य प्रशांत महासागरातील पाण्याचा पृष्ठभाग मोठ्या प्रमाणात थंड असून, ला-निना स्थिती तयार झाली आहे. त्यामुळे गेल्या काही आठवड्यांमध्ये व्यापारी वाऱ्यांचे प्रवाह वाढले असल्याचे जागतिक हवामान संघटनेने म्हटले आहे. सलग तीन वर्षे ला-निना वर्षे असणे म्हणजे जागतिक तापमान वाढ कमी झाली, असे म्हणणे योग्य नसल्याचे या संघटनेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

Weather Update
Rain Alert : राज्यात ठिकठिकाणी पावसाचा इशारा !

जागतिक हवामान संस्थेचे महासचिव पिटेरी तलास म्हणाले की, सलग तीन वर्षे ला-निना स्थिती असणे ही अपवादात्मक घटना आहे. यामुळे जागतिक तापमानवाढीचा वेग काहीसा कमी झाला असला, तरी दीर्घकालीन तापमानवाढीवर त्याचा परिणाम होणार नाही.

ला-निना हे विषुववृत्तीय प्रशांत महासागराचा पृष्ठभाग थंड होण्याचे नैसर्गिक चक्र आहे. ही एल-निनोच्या विरुद्ध प्रक्रिया असून, तिचा जागतिक हवामानावर परिणाम होतो. ला-निनामुळे अटलांटिक महासागरात चक्रीवादळे वाढतात, तसेच पश्‍चिम अमेरिकेत पाऊस कमी होऊन वणवे लागण्याचे प्रमाण वाढते. त्यामुळे अमेरिकेतील शेतीमध्ये नुकसान होते. त्यामुळे ला-निना अमेरिकेसाठी अधिक घातक असल्याचे अभ्यासावरून दिसून आले आहे.

प्रशांत महासागरातील एल-निनो, ला-निना आणि सर्वसामान्य स्थितीला एकत्रपणे ला-निनो सदर्न असोलेशन म्हणतात. कोळसा, तेल आणि वायूच्या ज्वलन या मानवनिर्मीत कारणामुळे हवामान बदलावर परिणाम होत असताना, ला-निनो सदर्न आसोलेशन अधिक प्रभावी ठरतो असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com