
Agrowon Agricultural Exhibition 2023 : सकाळ-ॲग्रोवनच्या (Agrowon) कृषी प्रदर्शनात मजूर टंचाईवर मात करणारी विविध अवजारे, यंत्रे शेतकऱ्यांना पाहण्यास मिळाली. काहींनी त्यातील सहजगत्या नेता येऊ शकतील अशा अवजारांची खरेदीही केली. अशा यंत्रांमुळे शेतीतील आमचे श्रम, वेळ यांच्यात बचत करणे शक्य असल्याच्या प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या.
शेती करताना शेतकऱ्यांना प्रामुख्याने मजुरांच्या समस्येला मोठ्या प्रमाणात सामोरे जावे लागते. अनेक वेळा मजुरांअभावी शेतीचे नुकसानही होते. त्यामुळे कृषी प्रदर्शनामध्ये शेतकऱ्यांचे कष्ट कमी करून कमी वेळेत काम होण्यासाठी उपयुक्त असलेल्या अवजारांच्या पाहणीकडे शेतकऱ्यांचा कल दिसून आला.
कृषी प्रदर्शनात अनेक शेतीचे कष्ट कमी करून वेळेत काम करणाऱ्या अवजारांनी शेतकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले. ट्रॅक्टरचलित यंत्रे, प्रामुख्याने नांगर, रोटाव्हेटर यासोबतच बैल चलितही अवजारांचा या प्रदर्शनात समावेश राहिला.
रोटावेटरमुळे आंतरमशागतीची कामे सोपे होऊन वेळेची बचत होते, अशी माहिती उत्पादकांकडून यावेळी देण्यात आली.
यासोबतच सुमो नांगर, विंटर टिलर, हायड्रॉलिक तंत्राच्या साह्याने चालणारे पेरणी यंत्र, टोकण व पेरणी यंत्र, कांदा लागवड यंत्र, भात रोवणी यंत्र, पॉवर टिलर, पॉवर वीडर, रिव्हर्स- फॉरवर्ड रोटरी, पलटी नांगर, रिपर कम वाईंडर, कल्टीवेटर, कम्बाईन हार्वेस्टर, कडबा कुट्टी यंत्र, ड्रोनद्वारे फवारणी यंत्र, कापणी यंत्र आधी कृषी प्रदर्शनात लक्षवेधी ठरली.
त्यांचा उपयोग मजूर समस्येवर मात करण्यासाठी नक्कीच होईल अशी प्रतिक्रिया अनेक शेतकऱ्यांनी दिली.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.