Paddy Harvesting : भातकापणीसाठी मिळेनात मजूर

विक्रमगड तालुक्यातील काही गावातील स्थिती पावसाच्या भीतीने शेतकरी कामाला
Rice Harvesting
Rice HarvestingAgrowon


विक्रमगड, जि.  पालघर : तालुक्यातील सर्वच गाव-पाड्यांत हळव्या भातकापणीच्या (Paddy Harvesting ) कामांनी वेग पकडला आहे. सर्वच शेतकरीवर्गाने आपल्या रीतीप्रमाणे शेतावरील देवतांना नारळ फोडून कापणीच्या कामाला सुरुवात केली आहे; पण दिवाळी संपल्यानंतर तालुक्यातील मजूरवर्ग विटभट्टींवर कामासाठी जात आहे. त्यामुळे भातकापणीची कामे करण्यासाठी मजूर मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे काही भागात कापणीची कामे खोळंबली आहेत.

Rice Harvesting
Paddy Harvesting : रायगड जिल्ह्यात भातकापणीला वेग

विभातलावणी, कापणीसाठी आणि इतर शेतीच्या कामांसाठी शेतकऱ्यांना तलासरी, डहाणू, जव्हार, मोखाडा, नाशिक या ठिकाणाहून मजूर आणावे लागत आहेत. या मजुरांना दररोज २०० ते ३०० रुपये मजुरी द्यावी लागते; पण मजुरांअभावी भातशेती संकटात सापडल्याचे चित्र तालुक्यात आहे. वि अनेक मजूर बोटींवर मासेमारीकरिता जात असतात. तसेच बिल्डिंगची कामे, नदी-खाडी किनारी रेती काढण्याकरिता जात आहेत. मजूर मिळत नसल्याने कामे कशी करायची, असा प्रश्न सतावत आहे.

Rice Harvesting
Paddy Harvesting : परतीच्या पावसामुळे भातकापणी लांबणीवर

भातपीक कापणीस आले आहे; पण भातकापणीसाठी मजूर मिळणे अवघड झाले आहे. त्यामुळे भातकापणी रखडली आहे. त्यामुळे भातकापणीसाठी जव्हार, मोखाडा या भागातून मजूर आणावे लागत आहेत.
- ज्ञानेश्वर जाधव, शेतकरी, विक्रमगड

महागडी यंत्रे न परवडणारी
भातलावणीपासून ते कापणीपर्यंतची सर्वच कामे मजुरांवर अवलंबून आहेत; तर कृषी विद्यापीठाने तयार केलेली भातलावणी, भातकापणी, भात झोडणी यंत्र महागडी असल्याने ती येथील शेतकऱ्यांना परवडत नाहीत. भातलावणीसाठी तसेच भातकापणीसाठी सक्षम शेतकऱ्यांनी बाहेर तालुक्याहून मजूर आणले आहेत. या मजुरांना प्रतिदिन २०० ते ३०० रुपये व तीन वेळा जेवणाचा खर्च करावा लागतो. हा खर्च सर्वसामान्य शेतकऱ्यांना न परवडणारा आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com