सोनांब्याच्या शेतकऱ्यांचा जीव टांगणीला

ढगफुटीसदृश पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाल्याने गावाच्या दक्षिणेला असलेला गुरदरी पाझर तलाव काही वेळातच तुडुंब भरला होता. तलावाच्या मुख्य सांडव्यातून मोठ्या प्रमाणावर विसर्ग होऊन नाल्यावरील तीन बंधारे फुटल्याने मोठे नुकसान झाले आहे.
Sinnar Heavy Rain
Sinnar Heavy RainAgrowon

नाशिक : सिन्नर तालुक्याच्या पश्‍चिम पट्ट्यात सोनांबे येथे गुरुवार(ता.१) सायंकाळी ७ ते ९ वाजेदरम्यान दोन तासात १४४ मिमी पावसाची नोंद झाली. ढगफुटीसदृश पावसामुळे (Cloudburst Rain) सर्वत्र पाणीच पाणी झाल्याने गावाच्या दक्षिणेला असलेला गुरदरी पाझर तलाव (Lake Burst) काही वेळातच तुडुंब भरला होता. तलावाच्या मुख्य सांडव्यातून मोठ्या प्रमाणावर विसर्ग होऊन नाल्यावरील तीन बंधारे फुटल्याने मोठे नुकसान (Agriculture Damage) झाले आहे.

त्यातच तलावाच्या मागील बाजूस भरावावरून विसर्ग होऊन १५ ते २० फुटांचा भराव खचला आहे. अवघा ३ फुट भराव शिल्लक असून, त्यासही येथे तडे गेल्याने तलाव फुटण्याचा धोका निर्माण झाला असल्यामुळे शेकडो एकरावरील पिके वाहून जाण्यासह जीवितहानी होण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे सोनांब्याच्या शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे.

Sinnar Heavy Rain
Crop Damage : वादळी पावसाने पिके आडवी

पाऊस उघडून तीन दिवस झालेले असतानाही पाझर तलावाच्या वरील भागांतील डोंगर भागातून पाण्याची मोठी आवक तलावात होत आहे. यापूर्वी मोठा विसर्ग झाल्याने या पूरपाण्यामुळे गावातील तीन तलाव फुटले. त्यामुळे कोबी, टोमॅटो, वाटाणा, गाजर अशी भाजीपाला पिके मोठ्या प्रमाणावर वाहून गेली आहेत. वाहून आलेल्या मातीमुळे ७ ते ८ विहिरी बुजून गेल्या आहेत. तर नाल्यालगत असलेले छोटे पूल वाहून गेल्याने शेतकऱ्यांचा संपर्क तुटला आहे. अशी भीषण परिस्थिती सध्या असताना तलाव फुटल्यास मोठा प्रलय होऊ शकतो.

Sinnar Heavy Rain
Sinnar Heavy Rain : सिन्नरच्या अतिवृष्टिग्रस्तांना मदत

Crop तलावाच्या खालील भागात मोठ्या प्रमाणावर द्राक्ष, टोमॅटो, कोबी, वाटाणा, गाजर व खरीप कांदा रोपवाटिका आहेत. जर तलाव फुटला तर शेकडो एकर क्षेत्र वाहून जाऊ शकते; शिवाय मोठी जीवितहानी सुद्धा घडू शकते असे येथील शेतकरी व महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे संचालक नंदू पाटील पवार यांनी ‘ॲग्रोवन’शी बोलताना सांगितले

प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने संताप :

१९७२ मध्ये गुरदरी पाझर तलावाचे बांधकाम झाले.त्यानंतर शासकीय यंत्रणेने अद्यापपर्यंत या धरणाची कुठलीही स्थितीची पाहणी तसेच ऑडिटही केलेले नाही, अशी माहिती येथील स्थानिक शेतकऱ्यांनी दिली. त्यामुळे ग्रामीण भागातील अशा अडचणींकडे शासकीय यंत्रणा दुर्लक्ष करत असल्याने अशा समस्या भोगावे लागतात असा संताप शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.

पाझर तलावाचा एक कोपरा फुटल्याने तलावापासून खालील दोन किलोमीटरवर अंतरावर माझ्या शेतात गुडघाभर पाणी वाहत होते. त्यात कोबी पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. जर आता हा तलावाचा मागील बाजूचा भराव फुटल्यास शेतकऱ्यांचे काहीही शिल्लक राहणार नाही. शिवाय मोठा अनर्थ घडू शकतो.
रमेश निवृत्ती पवार, शेतकरी, सोनांबे
ज्या दिवशी मोठी अतिवृष्टी झाली; त्या दिवशी बंधाऱ्याच्या मागील बाजूस सांडव्यावरून पाणी वाहत होते. त्याच दिवशी प्रशासनाला याबाबत कळविण्यात आले. अधिकाऱ्यांनी येऊन या ठिकाणी नुसतीच पाहणी केली. मात्र अद्यापपर्यंत काहीही कृती झालेली नाही. त्यामुळे जर अनर्थ घडला यास फक्त शासकीय यंत्रणा जबाबदार राहील. अगोदरच आम्हाला मोठा फटका बसलेला आहे, याकडे तातडीने गांभीर्याने बघावे
लक्ष्मण माधव पवार, शेतकरी, सोनांबे, ता. सिन्नर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com