Landslide : ओडिशात भूस्खलनामुळे १० घरांचे नुकसान

गजपती जिल्ह्यातील नुआगाडा ब्लॉक अंतर्गत नुआपाली गावात भूस्खलनामुळे किमान १० घरांचे नुकसान झाले. भूस्खलनानंतर लोकांनी ताबडतोब घरे सोडल्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी मालमत्तेचे नुकसान झाले आहे, असे जिल्हास्तरीय अधिकाऱ्याने सांगितले.
Odessa Landslide
Odessa Landslide Agrowon

भुवनेश्‍वर (वृत्तसंस्था) ः गजपती जिल्ह्यात भूस्खलनामुळे (Landslide In Odessa) किमान १० घरांचे नुकसान झाले, तर मलकानगिरी आणि कालाहंडी जिल्ह्यांतील प्रमुख रस्ते सोमवारी (ता. ११) रात्रभर पडलेल्या मुसळधार पावसामुळे (Heavy Rain) पाण्याखाली गेले आहेत. पुढील ४८ तासांत दक्षिण ओडिशात नऊ जिल्ह्यांत मुसळधार ते अतिवृष्टीचा अंदाज हवामान खात्याने (Heavy Rain Forecast By Weather Department) वर्तवला आहे. मुसळधार ते अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी पाणी साचले. सोमवारी (ता. ११) कमी दाबाची प्रणाली (लोपर) तयार झाल्यामुळे ओडिशात अतिवृष्टी (Heavy Rain In Odessa) झाल्याचे हवामान खात्याने मंगळवारी (ता. १२) स्पष्ट केले.

Odessa Landslide
उध्दव ठाकरेंना आसाम भेटीचे आमंत्रण

दळणवळण विस्कळीत

गजपती जिल्ह्यातील नुआगाडा ब्लॉक अंतर्गत नुआपाली गावात भूस्खलनामुळे किमान १० घरांचे नुकसान झाले. भूस्खलनानंतर लोकांनी ताबडतोब घरे सोडल्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी मालमत्तेचे नुकसान झाले आहे, असे जिल्हास्तरीय अधिकाऱ्याने सांगितले. आंध्र प्रदेश आणि छत्तीसगडला लागून असलेल्या मलकानगिरी जिल्ह्यातील मोटू भागात अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. मलकानगिरी ते तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि छत्तीसगड दरम्यानच्या रस्तावरील दळणवळण विस्कळीत झाले आहे, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. कालाहंडी जिल्ह्यातील प्रमुख रस्त्यांवरूनही पावसाचे पाणी वाहत आहे. हवामान खात्याने मच्छीमार लोकांना शनिवारपर्यंत पश्चिम-मध्य आणि वायव्य बंगालच्या उपसागराच्या ओडिशाच्या किनाऱ्यालगतच्या समुद्रात न जाण्याचा सल्ला दिला आहे.

कालाहंडी जिल्ह्यातील लांजीगडमध्ये गेल्या २४ तासांत सकाळी ८.३० वाजेपर्यंत १७१.६ मिमी पाऊस पडला, त्यानंतर रायगडातील अंबाडोला येथे १५५ मिमी पाऊस झाला, असे हवामान खात्याने सांगितले.

मुसळधार पाऊस, अतिवृष्टीचा इशारा

दरम्यान, राज्यातील नऊ जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे, असे हवामान खात्याचे शास्त्रज्ञ यू. एस. डॅश यांनी सांगितले. नऊ दक्षिण जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला असून, ज्यामुळे डोंगराळ भागात आणखी भूस्खलन होऊ शकते आणि रस्ते आणि शेतात पाणी येऊ शकते. बुधवारी ज्या जिल्ह्यांना नारिंगी इशारा देण्यात आला होता त्यामध्ये कोरापुट, मलकानगिरी, नबरंगपूर, नुआपाडा, कालाहंडी, कंधमाल, बोलंगीर, गंजम आणि नयागड यांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे रायगडा, गजपती, खुर्डा, पुरी, कटक, जगतसिंगपूर, बौध, सोनपूर, बारगढ, अंगुल, ढेंकनाल आणि केओंझार जिल्ह्यांमध्ये एक किंवा दोन ठिकाणी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. याशिवाय, ओडिशाच्या जिल्ह्यांमध्ये बहुतांश ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस किंवा मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे, असे हवामान खात्याने म्हटले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com