Fertilizers : रब्बीतही खतांसाठी शेतकऱ्यांची वणवण

लिंकिंग जोरात; १०.२६.२६, पोटॅशची मोठी टंचाई
Fertilizers
FertilizersAgrowon


अॅग्रोवन वृत्तसेवा
जळगाव ः खरिपानंतर आता रब्बी हंगामातही (Rabbi Season) रासायनिक खतांची (Chemical Fertilizers) मोठी टंचाई जिल्ह्यात आहे. १०.२६.२६, पोटॅशचा तुटवडा आहे. काळाबाजार व लिंकिंगही जोरात असून, कृषी विभागही हतबल झाल्याची स्थिती आहे.

Fertilizers
जळगावात खतांसाठी शेतकऱ्यांची वणवण

जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, भडगाव, पारोळा, अमळनेर, चोपडा, यावल, रावेर भागात पोटॅशसह १०.२६.२६ची अभूतपूर्व टंचाई सध्या आहे. त्याचा पुरवठाही सुरळीत नाही. मध्यंतरी जिल्ह्यात १०.२६.२६ खतांचा रॅक दाखल झाला. परंतु तो मलकापूर (जि. बुलडाणा) रेल्वे स्थानकावर होता. तेथून जळगाव व इतर भागात खते आणण्यासाठी वितरकांना गोणीमागे ६० रुपये खर्च येत होता. कारण कंपनी फक्त ६० किलोमीटरपर्यंत खते पोच करते. यामुळे जळगाव, चोपडा व इतर भागांत १०.२६.२६ खत पोचू शकले नाही.

Fertilizers
औरंगाबाद, जालना, बीड जिल्ह्यात शेतकऱ्यांची होतेय खतांसाठी वणवण

आता रब्बीची पेरणी, लागवड सुरू आहे. काहींनी मागील १५ दिवसांपूर्वीच पेरणी केली आहे. त्यासाठी खते हवी आहेत. जिल्ह्यात १०.२६.२६ची सर्वाधिक मागणी असते. परंतु हे खत पुरेसे नाही. जळगाव, धरणगाव, पारोळा, एरंडोल, चोपडा, भुसावळ, जामनेर, मुक्ताईनगर येथे १०.२६.२६ खतावर लिंकिंग सुरू आहे. एका गोणीवर २४० रुपयांचा नॅनो युरिया किंवा २५० ते ३०० रुपयांचे इतर विद्राव्य खत शेतकऱ्यांना घेण्याची सक्ती केली जात आहे. लिंकिंगचे खत घेण्यास नकार दिल्यास १०.२६.२६ खत देण्यास विक्रेते सपशेल नकार देत आहेत. केंद्राने अलीकडेच खत कंपन्यांना लिंकिंगबाबत तंबी दिली आहे. परंतु १०.२६.२६, डीएपी आदी खतांवर लिंकिंग सुरूच आहे. १०.२६.२६ मिळत नसल्याने शेतकऱ्यांना इतर खते घ्यावी लागत आहेत.

पोटॅशची गरज चोपडा, जळगाव, रावेर, यावल, जामनेर, मुक्ताईनगर आदी भागात अधिक असते. कारण केळीला पोटॅश हवे असते. या भागात केळी पीक अधिक असल्याने पोटॅशची मागणी मागील दोन महिन्यांपासून अधिक आहे. परंतु पोटॅश बाजारात नाही. पोटॅश नसल्याने शेतकरी महागडी पोटॅशयुक्त विद्राव्य किंवा इतर पर्यायी खते घेत आहेत. यामुळे उत्पादन खर्च वाढला आहे. काळाबाजार, लिंकिंगबाबत कृषी विभागाने धडक कारवाई खरिपातही केली नाही. रब्बीतही कृषी विभाग या समस्येबाबत कानावर हात ठेवून आहे. खत कंपन्यांची चूक, दोष दाखवून कृषी विभाग नामानिराळा होत आहे. यामुळे शेतकरी तक्रार करणार कुठे, असा प्रश्न आहे. दुसरीकडे खते मुबलक असल्याची पत्रकबाजी सतत केली जाते. पण बाजारात इतर खतांबाबतही टंचाईसारखीच स्थिती आहे.

कोट
१०.२६.२६चा पुरवठा मध्यंतरी झाला. पण तो बोदवड, मुक्ताईनगर तालुक्यांमध्ये वितरण सुकर होण्यासाठी मलकापूर (जि. बुलडाणा) येथील मालधक्क्यावर मागविण्यात आला. खतांचा साठा आहे. लिंकिंगबाबत वरिष्ठ कार्यालयाच्या सूचनेनुसार किंवा मार्गदर्शन घेऊन लवकरच खत कंपन्या व संबंधितांना पत्र जारी केले जाईल.
- वैभव शिंदे, कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद, जळगाव

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com