
अॅग्रोवन वृत्तसेवा
हिंगोली ः हिंगोली जिल्ह्यातील यंदाच्या (२०२२) खरीप हंगामाची अंतिम पैसेवारी जिल्हा प्रशासनातर्फे गुरुवारी (ता.१५) जाहीर करण्यात आली. लागू असलेल्या सर्व ७०७ गावांची सरासरी पैसेवारी ४७.३२ पैसे आली आहे.
हिंगोली जिल्ह्यातील सर्व पाच तालुक्यांतील लागवडीयोग्य क्षेत्र ३ लाख ९८ हजार ४२६ हेक्टर आहे. यंदाच्या खरीप हंगामात ३ लाख ७६ हजार ७९७ हेक्टरवर सोयाबीन, कपाशी, तूर, मूग, उडीद, ज्वारी आदी पिकांची पेरणी झाली. एकूण २१ हजार ६२९ हेक्टर क्षेत्र पडीक राहिले. पावसाळ्यात अनेकवेळा झालेली अतिवृष्टी, सततच्या पावसामुळे सर्वच पिकांच्या उत्पादनात घट आली. जिल्हा प्रशासनाने जाहीर केलेल्या अंतिम पैसेवारीनुसार जिल्ह्यातील सर्व ७०७ गावांची अंतिम पैसेवारी
५० पैसेपेक्षा कमी म्हणजेच सरासरी ४७.३२ पैसे आली असल्याचे जाहीर केले. यामुळे जिल्ह्यात दुष्काळग्रस्तांसाठी असलेल्या सवलती लागू होऊ शकतील, असे सूत्रांनी सांगितले.
खरीप हंगाम अंतिम पैसेवारी स्थिती (क्षेत्र हेक्टरमध्ये)
तालुका...गावे..लागवडीयोग्य क्षेत्र...पेरणी क्षेत्र...पडीक क्षेत्र...पैसेवारी
हिंगोली...१५२...८२९५८...८२६२७...३३०...४९.०३
कळमनुरी...१४८...७७०१९...७४७२२...२२९७...४७.५९
वसमत...१५२...७८९४०...६३७३३...१५२०७...४२.००
औंढा नागनाथ...१२२...६६७८८...६४१५५...२६३३...४९.३०
सेनगाव...१३३...९२७२०...९१५६०...११६०...४९.६६
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.