Mango Season : यंदा रसायनी परिसरात उशिराने आंब्याला मोहोर

लांबलेला पावसाळा, उशिरा पडलेली थंडी, थंडी सुरू होऊन दहा ते पंधरा दिवस पडलेले धुके अशा अधूनमधूनच्या खराब हवामानाच्या परिणामामुळे आंब्याला उशिरा मोहोर आला आहे.
Amba Mohar
Amba Mohar Agrowon

Mango Season रसायनी : रसायनी परिसरात यंदाच्या वर्षी खराब हवामानाचा फटका (Bad Weather)आंब्याच्या पिकाला (Mango Crop) बसला आहे. सध्या अनेक झाडांना मोहोर (Mango Blossom) येऊ लागला आहे. यापूर्वी थोडा फार मोहोर आलेल्या आंब्याच्या काही झाडांनाही पुन्हा मोहोर येऊ लागला आहे.

Amba Mohar
Maha kesar Mango : ‘महा केसर’ आंबा ब्रँड तयार करणार

सध्याचे अनुकूल वातारणात (Weather) असल्याने मोहोर चांगला येत आहे, असे मंगेश देसाई आणि इतर शेतकर्!यांनी सांगितले. काही दिवसांपासून आंब्याला मोहोर येऊ लागल्याने शेतकर्!यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

Amba Mohar
Amba Mohor : आंबा मोहर गळण्याची कारणे काय आहेत?

परिसरात शेतकर्!यांच्या शेताच्या बांधावर रायवळ, कलमी आंब्याची झाडे अंगणात किंवा परसदारी दिसत आहेत.

लांबलेला पावसाळा, उशिरा पडलेली थंडी, थंडी सुरू होऊन दहा ते पंधरा दिवस पडलेले धुके अशा अधूनमधूनच्या खराब हवामानाच्या परिणामामुळे आंब्याला उशिरा मोहोर आला आहे.

बागेतील आंब्याच्या झाडांप्रमाणे रायवाळ आंब्याच्या झाडांना खत, पाणी, औषध फवारणी कोणी करत नाही; मात्र तरी आंब्याला चांगला मोहोर येत आहे. महाशिवरात्रीपर्यंत आंब्याच्या झाडांना मोहोर येण्याचा कालावधी असल्याचे कृषीमित्र सुदाम कडपे यांनी सांगितले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com