Rabi Season : रब्बी हंगामाला उशिराने प्रारंभ

परतीच्या पावसामुळे सोयाबीन काढणीला झालेला विलंब आता रब्बी हंगामालाही सुरुवातीलाच बाधक ठरला आहे. हा हंगाम काही ठिकाणी १५ ते ३० दिवसांपर्यंत उशिराने सुरू होत आहे. परिणामी अर्धा नोव्हेंबर संपायला येऊनही रब्बी लागवड रेंगाळली आहे.
Rabi Season
Rabi SeasonAgrowon

अकोला ः परतीच्या पावसामुळे सोयाबीन काढणीला (Soybean Harvesting) झालेला विलंब आता रब्बी हंगामालाही (Rabi Season) सुरुवातीलाच बाधक ठरला आहे. हा हंगाम काही ठिकाणी १५ ते ३० दिवसांपर्यंत उशिराने सुरू होत आहे. परिणामी अर्धा नोव्हेंबर संपायला येऊनही रब्बी लागवड (Rabi Sowing) रेंगाळली आहे. अवघ्या १० ते १५ टक्के क्षेत्रावरच आतापर्यंत लागवड झालेली आहे.

जिल्हयात या रब्बी हंगामात सुमारे एक लाख १८ हजार हेक्टरवर लागवडीचे नियोजन करण्यात आलेले आहे. यात प्रामुख्याने हरभरा व गहू हीच दोन प्रमुख पिके आहेत. हरभऱ्याचे सरासरी क्षेत्र ९५ हजार हेक्टर क्षेत्र असून आतापर्यंत ८ हजार हेक्टवर पेरणी झाली तर गव्हाची अवघी ११०० हेक्टरपर्यंत लागवड पोचली.

Rabi Season
Farmer CIBIL : ‘सीबील’चा मुद्दा केंद्र सरकार तपासणार

वास्तविक गव्हाचे क्षेत्र २१हजार ५८८ हेक्टर आहे.यावर्षी परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला होता. सोयाबीन काढणीला विलंब झाला. आता या भागात आंतरमशागतीसह पेरण्यांची कामे सुरू झालेली आहे. खारपाण पट्ट्यात रब्बीत हरभऱ्याचे हक्काचे पीक घेतले जाते. या पिकाची उत्पादकताही चांगली राहते. या हंगामात जिल्ह्यात हरभऱ्याचे सुमारे ९४ हजार ६७८ हेक्टरवर नियोजन केले आहे. त्यापैकी ७९११ हेक्टरवर पेरणी पोहोचली.

रब्बीसाठी पोषक स्थिती

परतीचा पाऊस तसेच प्रकल्पांमध्ये साठा झालेला असल्याने रब्बी हंगामासाठी पोषक स्थिती तयार झालेली आहे. पेरणीसाठी हवी असलेली ओल मिळाल्याने हरभरा, गव्हाचे पीक जोमाने उगवत आहे. तर येत्या काळात सर्वच प्रकल्पांवरून सिंचनासाठी पाणी पुरवठ्याचे नियोजन करण्यात आलेले आहे.

Rabi Season
Onion Rate : कांदा उत्पादकांचा पुन्हा भ्रमनिरास | ॲग्रोवन

रब्बीसाठी काटेपूर्णा प्रकल्पातून यंदा सुमारे ७००० हेक्टर तर उमा प्रकल्पाचे १८०० हेक्टरचे नियोजन असल्याचे समजते. येत्या गुरुवारी (ता.१७) या हंगामाच्या दृष्टीने पाणीवापर संस्था, कालव्यांवरील शेतकऱ्यांची बैठक होत आहे.

त्यामध्ये पाणी वितरणाबाबत, पहिले आवर्तन सोडण्याचे नियोजन होईल. तरीही महिनाअखेर पहिले आवर्तन सुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दुसरीकडे पाणी वापर संस्थांनी कालव्यांच्या दुरुस्तीची मागणी आधीच केलेली आहे. उपलब्ध निधीतून हे काम केले जाणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com