Gram sevak Recruitment : कृषी सेवकांना खाबूगिरीचा फटका

पात्र उमेदवारांची तीन वर्षे वणवण; तत्कालीन लातूर विभागीय सहसंचालकांचा प्रताप
 Latur Divisional Joint Director Gramsevak Recruitment
Latur Divisional Joint Director Gramsevak RecruitmentAgrowon

बाळासाहेब पाटील ः ॲग्रोवन वृत्तसेवा
मुंबई : लातूर कृषी विभागांतर्गत २०१९ मध्ये घेण्यात आलेल्या कृषी सेवक (GramSevak) परीक्षेतील पात्र उमेदवारांना डावलून अन्य विभागातील कृषी सेवकांना संधी देण्याचा प्रताप कृषी खात्याने (Agriculture Department) केला आहे. या परीक्षेतील पात्र उमेदवारांच्या पदरी सध्या वणवण आली आहे. ऐन दिवाळीत हे उमेदवार अधिकाऱ्यांच्या मिनतवाऱ्या करत होते. मात्र दोषी अधिकाऱ्यांची चौकशी सुरू असल्याचे सांगून वेळ मारून नेली आहे.

 Latur Divisional Joint Director Gramsevak Recruitment
कृषी योजनेतील विहिरींनाही दुष्काळाचा फटका

कृषी सेवकांच्या विभागनिहाय नियुक्तीच्या सूचना असतानाही कोरोना काळात अर्थव्यवहार करत अन्य विभागातील कृषी सेवकांना सामावून घेण्यात लोकप्रतिनिधींसह अधिकाऱ्यांनीही हात ओले केले आहेत. त्यामुळे पात्रता असूनही उमेदवारांना नोकरीसाठी मिनतवाऱ्या कराव्या लागत आहेत.

लातूर कृषी विभागात १६९ कृषी सेवकांच्या पदांसाठी ३ जानेवारी २०१९ रोजी जाहिरात काढण्यात आली. त्यासाठी २२ ते २४ फेब्रुवारीदरम्यान ऑनलाइन परीक्षा घेण्यात आली. तिचा निकाल जुलै, २०१९ मध्ये जाहीर झाला. त्यानंतर जानेवारी २०२० ला पात्र उमेदारांची यादी प्रसिद्ध करण्यात आली. दरम्यान, कोरोनामुळे सर्वत्र लॉकडाऊन झाल्यानंतर ही प्रक्रिया थांबविण्यात आल्याचे संबंधित उमेदवारांना कळविण्यात आले. मात्र १२४ पैकी ९९ कृषी सेवक अन्य विभागातून लातूर विभागात सामावून घेतले. मुळात रिक्त पदांवर सरळसेवेतील उमेदवारांना नियुक्ती देणे नियमानुसार बंधनकारक असताना आर्थिक व्यवहार करून अन्य विभागातील कृषी सेवकांना सामावून घेतले गेले.

 Latur Divisional Joint Director Gramsevak Recruitment
Cotton Management : ठिबक, खते, पीक व्यवस्थापनातून कापूस उत्पादन वाढीचा प्रयोग

सरळसेवेने पात्र ठरलेल्या उमेदवारांना नियुक्ती देण्याबाबत लातूरचे तत्कालीन कृषी सहसंचालक टी. एन. जगताप यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी कृषी सेवक भरती हा संपूर्ण राज्याचा विषय होता. त्यानुसार राज्य सरकारने सर्व विभागीय कृषी सहसंचालकांकडून रिक्त पदांची माहिती मागविली होती. त्यानुसार रिक्त पदे आणि संभाव्य रिक्त पदे अशी जाहिरात काढण्यात आली होती. या दोन्ही संख्या एकत्र करून गुणवत्ता यादी तयार करण्यात आली. यातील शुद्ध रिक्त पदे भरण्यात आली आणि संभाव्य रिक्त पदांची परीक्षा कोरोना काळात होऊ शकली नाही, असा दावा केला.

मात्र लातूर कृषी विभागासाठी १६९ पदांची जाहिरात काढण्यात आली. त्यापैकी १४६ उमेदवार पात्र ठरले होते. त्यापैकी कागदपत्रे पडताळणीत १२४ उमेदवार पात्र ठरले होते. मात्र पदे रिक्त नसल्याचे कारण देत केवळ ६३ उमेदवारांना नियुक्ती देण्यात आली. त्यामुळे अन्य उमेदवार प्रतीक्षा यादीत होते. लातूर कृषी विभागातील रिक्त जागांबाबत माहिती अधिकारातून मिळालेल्या माहितीनुसार १४४ जागा रिक्त असल्याचे समोर आले. त्यामुळे उर्वरित जागा कुणासाठी रिक्त ठेवल्या याचे गौडबंगाल अर्थकारणात लपल्याचा आरोप पात्र उमेदवार करत आहेत. १४४ पैकी ४४ पदे शुद्ध रिक्त आहेत. तर २०१९ मध्ये पदोन्नती, सेवानिवृत्ती आणि इतर कारणांमुळे ६७ पदे तर २०२० मध्ये ३३ पदे रिक्त आहेत.

सरळसेवेतील पात्र उमेदवारांनी थेट मुंबई उच्चन्यायालयात धाव घेतल्यानंतर कृषी विभागाने तत्कालीन कृषी सहसंचालक टी. एन. जगताप यांची खातेनिहाय चौकशी सुरू केल्याचे सांगण्यात आले. मात्र, आपली चौकशी सुरू आहे की नाही या बाबत कल्पना नाही, असे जगताप यांनी ‘ॲग्रोवन’शी बोलताना सांगितले.

मंत्रालयात खेटे
औरंगाबाद खंडपीठाने हे प्रकरण ‘मॅट’कडे वर्ग केले आहे. तीन वर्षांनंतरही या प्रकरणाचा निकाल न आल्याने संबंधित पात्र उमेदवार आता मंत्रालयात खेटे घालत आहेत. मिळेल त्या आमदारांच्या खोल्यांमध्ये या तरुणांनी मुक्काम ठोकत ऐन दिवाळीत नोकरीसाठी अधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेत व्यथा मांडल्या. मात्र, आता तुम्ही मॅटमध्ये गेलात तर तिथून नियुक्ती घ्या, असा पवित्रा अधिकारी घेत आहेत.

या भरतीत मोठा आर्थिक व्यवहार झाला आहे. पात्र उमेदवारांना डावलून अन्य विभागातील कृषी सेवकांना सामावून घेण्यासाठी पाच लाखांपासून १० लाखांपर्यंत आर्थिक व्यवहार झाले आहेत. अन्य विभागातील प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना नियुक्ती मिळाली, मात्र आम्ही पात्र उमेदवार असूनही आम्हाला नियुक्ती मिळत नाही. आम्ही शेतकऱ्यांच्या पोरांनी कुणाकडे जायचे?
- यशवंत माने, कृषी सेवक परीक्षेतील पात्र उमेदवार

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com