Nagar APMC Election : नगरला नेत्यांनी आपापल्या सत्ता राखल्या

नगर जिल्ह्यात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत राहुरी बाजार समितीत आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या महाविकास आघाडीच्या सत्ता कायम राखत १८ पैकी सोळा जागा जिंकल्या.
Nagar APMC Election
Nagar APMC ElectionAgrowon

Nagar APMC Election जिल्ह्यातील शुक्रवारी (ता. २८) मतदान झालेल्या नगर तालुका, पारनेर, पाथर्डी, कर्जत, संगमनेर, राहुरी, श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समित्यांची मतमोजणी शनिवारी (ता. २९) झाली. बहुतांश तालुक्यात नेत्यांनी आपापल्या बाजार समितीत सत्ता कायम राखली.

मात्र दरवेळीच्या तुलनेत यावेळी मोठा आर्थिक खर्च करावा लागला. अगदी एक एका मताचा दर मोठा होता. सात बाजार समित्यापैकी चार बाजार समित्यांवर महाविकास आघाडीचे, तर तीन बाजार समित्यांवर भाजपची सत्ता आली.

नगर जिल्ह्यात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत राहुरी बाजार समितीत आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या महाविकास आघाडीच्या सत्ता कायम राखत १८ पैकी सोळा जागा जिंकल्या. दोन जागा भाजपला मिळाल्या.

संगमनेर बाजार समितीत माजी महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या महाविकास आघाडीला १७ जागा मिळाल्या. एका जागेवर अपक्ष निवडून आला.

Nagar APMC Election
APMC Election In Marathwada : मराठवाड्यात अनेक प्रस्थापितांना धोबीपछाड

महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी प्रचारात जोर देऊनही संगमनेरमध्ये एकही जागा मिळाली नाही. पाथर्डी बाजार समितीत आमदार मोनिका राजळे यांच्या नेतृत्वाखाली भाजपने सर्व १७ जागा जिंकल्या.

Nagar APMC Election
APMC Election Maharashtra : बाजार समित्यांवर ‘मविआ’चे वर्चस्व!

महाविकास आघाडीचा येथे दारुण पराभव झाला. जिल्ह्यात सर्वात मोठ्या असलेल्या नगर तालुका बाजार समितीत अनेक वर्षापासून माजीमंत्री व जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले यांची सत्ता आहे.

यावेळी महाविकास आघाडीने भाजपसमोर कडवे आव्हान उभे केले होते. मात्र निकालानंतर बाजार समितीवर शिवाजीराव कर्डिले यांचीच पकड असल्याचे दिसून आले. त्यांनी सर्वच्या सर्व१८ जागांवर एकतर्फी विजय मिळवला.

खासदार डॉ. सुजय विखे आणि आमदार नीलेश लंके यांनी पारनेर बाजार समितीची निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. विधानसभेचे माजी उपसभापती विजय औटी यांच्यासोबत लंके यांनी या निवडणुकीत जुळवून घेतले.

लोकसभा डोळ्यासमोर पारनेर बाजार समितीच्या निवडणुकीच्या निमित्ताने लंके-विखेत जाहीर आरोप-प्रत्यारोप झाले.

मात्र निकालानंतर आमदार नीलेश लंके यांचेच पारनेरला वर्चस्व असल्याचे दिसून आले. बाजार समितीत १८ जागांपैकी सर्व जागांवर महाविकास आघाडीने विजय मिळवला.

कर्जत बाजार समितीत आमदार रोहीत पवार यांच्या महाविकास आघाडी व आमदार राम शिंदे यांच्या भाजपच्या पॅनेलमध्ये चुरस झाली. येथे १८ पैकी ९ महाविकास आघाडीला तर भाजपला ९ जागा मिळाल्या.

मिळालेल्या जागा अशा

एकूण जागा भाजप महाविकास आघाडी

नगर तालुका ः १८ १८ ००

पारनेर ः १८ ० १८

कर्जत ः १८ ९ ९

राहुरी ः १८ २ १६

संगमनेर ः १८ ०० १७ (एक अपक्ष)

पाथर्डी ः १८ १७ १

श्रीगोंदा ः १८ ७ (नागवडे-पाचपुते) ११ (जगताप-राष्ट्रवादी)

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com