मांजरीच्या मागे धावताना बिबट्या थेट घरात

शिकारीसाठी मांजरीच्या मागे पळत असलेला बिबट्या सिमेंटचा पत्रा फोडून घरात पडला.
Leopard Atatck
Leopard AtatckAgrowon

नाशिक : शिकारीसाठी मांजरीच्या मागे पळत असलेला बिबट्या (Leopard) सिमेंटचा पत्रा फोडून घरात पडला. ही घटना लहवीत (ता. नाशिक) येथे गुरुवारी (ता. १०) मध्यरात्री घडली. बिबट्या घरात (Leopard Entered In House) पडल्याची चाहूल लागताच घरातील लोकांनी वेळीच बाहेर पडत जीव वाचविल्याने पुढील अनर्थ टळला.

Leopard Atatck
Leopard: वडगाव काशिंबेत भर वस्तीत बिबट्याचा वावर

लहवित येथे मध्यरात्री सव्वा दोन वाजता येथील शुभम गायकवाड आणि त्यांचे कुटुंबीयांना मांजर आणि बिबट्याच्या गुरगुरण्याचा आवाज आला. या वेळी घराजवळ बिबट्या आल्याची चाहूल त्यांना लागली. यानंतर ते मागील खोलीत थांबले. मांजरीची शिकार करण्यासाठी बिबट्या मांजरीच्या मागे धावत असताना मांजर घरावर चढली.

Leopard Atatck
Leopard : उंडवडी परिसरात बिबट्याची दहशत

त्यानंतर बिबट्याने घरावर चढून मांजरीवर झडप टाकली. त्या वेळी तो थेट सिंमेटच्या पत्र्यावर पडला. यानंतर पत्रा फुटल्याने बिबट्या थेट घरातील स्वयंपाक खोलीत पडला. त्यानंतर बिबट्या घरातील दरवाजा मागे जाऊन लपला. गायकवाड कुटुंबीय तत्काळ मागील खोलीची खिडकी तोडून घराबाहेर पडले.

घटनेची माहिती तत्काळ वनविभागास कळविण्यात आली. त्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी विवेक भदाणे आणि त्यांच्या पथकाने घटनास्थळ गाठून बिबट्याचा शोध घेतला. मात्र बिबट्या घरात आढळला नाही. त्यानंतर पथकाकडून पहाटेपर्यंत आजूबाजूला बिबट्याचा शोध घेण्यात आला. मात्र त्यांना बिबट्या मिळून आला नाही.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com