Leopard Terror : खापर परिसरात बिबट्याचा वावर

अक्कलकुवा तालुक्यातील खापर शहराजवळील ब्राह्मणगाव शिवारात बिबट्याचा मुक्तसंचार वाढला असून, श्री महावीर गोशाळा येथील गायीवर बिबट्याने हल्ला करून फस्त केल्याची खळबळजनक घटना घडली.
Leopard Terror
Leopard TerrorAgrowon

अक्कलकुवा, जि. नंदुरबार ः अक्कलकुवा तालुक्यातील खापर शहराजवळील ब्राह्मणगाव शिवारात बिबट्याचा (Leopard Terror) मुक्तसंचार वाढला असून, श्री महावीर गोशाळा येथील गायीवर बिबट्याने हल्ला (Leopard Attack) करून फस्त केल्याची खळबळजनक घटना घडली.

गायीसोबत वासरालादेखील गंभीर जखमी केले. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

खापर येथील श्री महावीर गोशाळेतील गाय गोशाळेतील छावणीत बांधली होती. गायीसोबत वासरालादेखील गंभीर जखमी केले. सायंकाळी गोशाळेतील कर्मचाऱ्यांनी गाय जमिनीवर मृतावस्थेत पाहिली. परिसरात बिबट्याच्या पावलांचे ठसे दिसून आले.

Leopard Terror
Leopard : गोदाकाठी बिबट्याचा वावर

परिसरात काही महिन्यांपासून बिबट्याचा मुक्त वावर असल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येत आहे. अनेक वेळा खापर, कोराई येथील नागरिकांनी बिबट्याला पाहिले आहे. बिबट्याने कोराई येथील अनेक जनावरांसह शेळीवर हल्ला करून फस्त केले आहे.

विशेषतः कोराई गावातील किनारपट्टीवर असणाऱ्या घराबाहेरील अंगणातून बिबट्याने जनावरांना नेल्याची घटनादेखील घडली आहे.

वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी परिसरात पाहणी करून बिबट्या असल्याची खात्री करून पिंजरा लावून जेरबंद करण्यासाठी प्रयत्न केले होते, मात्र त्यात त्यांना यश आले नव्हते.

बिबट्याला पकडण्याची मागणी...

सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या परिसरात, तसेच अक्कलकुवा, खापर, वाण्याविहीर व परिसरात ऊस व मक्याची शेती मोठ्या प्रमाणावर होते. त्यामुळे गरजेप्रमाणे स्थलांतर करीत असावा, असा नागरिकांचा अंदाज आहे.

अनेक वेळा रायसिंगपूर, कोराई, ब्राह्मणगाव, कौली येथील शेतकऱ्यांना उसाच्या शेतात याचा संचार असल्याचे दिसून आले आहे. बिबट्याच्या संचारामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

वन विभागाने याकरिता खापर गोशाळेतील परिसरात दोन कॅमेरे लावले असल्याची माहिती वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी दिली. बिबट्याला लवकरात लवकर पकडून नागरिकांमधील भीती दूर करावी, अशी मागणी आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com