Leopard: वडगाव काशिंबेत भर वस्तीत बिबट्याचा वावर

सतत पडत असलेल्या पावसामुळे (Constant Rain) बिबट्यांनी (Leopard) निवाऱ्यासाठी गावातील मंदिरे व घरांच्या आडोशाला वास्तव्य करण्यास सुरुवात केली आहे.
Leopard
LeopardAgrowon

मंचर, जि. पुणेः श्रीक्षेत्र वडगाव काशिंबे (ता. आंबेगाव) येथे भर वस्तीत असलेल्या गोसावी बाबा मंदिराच्या छतावर बिबट्याने (Leopard) बैठक मारली. सतत पडत असलेल्या पावसामुळे बिबट्यांनी निवाऱ्यासाठी गावातील मंदिरे व घरांच्या आडोशाला वास्तव्य करण्यास सुरुवात केली आहे. रात्रीसह दिवसाही बिबट्याचा वावर वाढल्याने गावकरी भयभीत झाले आहेत.

वडगाव काशिंबे परिसरात गावात मोठ्या प्रमाणात उसाचे (Sugarcane) क्षेत्र आहे. येथे सध्या तीन बिबट्यांचा वावर असल्याची माहिती माजी सरपंच बाळासाहेब पिंगळे यांनी दिली. ते म्हणाले, ‘‘गेल्या आठवड्यात महावितरण कंपनीच्या रोहित्राच्या उघड्या केबलला स्पर्श झाल्यामुळे शेळीची शिकार करून जाणारा बिबट्या मृत्युमुखी पडला होता. याव्यतिरिक्त अजून तीन बिबट्यांचा वावर गाव व परिसरात आहे.

शेतीच्या कामावरही मोठा परिणाम झाला आहे. बिबट्याच्या भीतीमुळे मजूर शेतात काम करत नाहीत. राहुल डोके, सागर डोके, वैभव चव्हाण हे सकाळीच गावातून जात असताना त्यांना बिबट्या दिसला यामुळे त्यांनी तातडीने मंदिर परिसरात राहणाऱ्या गावकऱ्यांना मोबाइलद्वारे संपर्क करून सतर्क केले.

गावातच बिबट्याचा वावर वाढल्यामुळे लहान मुलांना व नागरिकांना घराबाहेर पडणे धोक्याचे वाटू लागले आहे. एखादी दुर्घटना घडण्यापूर्वी वन खात्याने गावठाणात व परिसरात ताबडतोब पिंजरे लावून बिबटे जेरबंद करावेत.

आकांक्षा गावडे-टेके

श्रीक्षेत्र वडगाव काशिंबे येथील शेतकरी व ग्रामस्थांबरोबर शुक्रवार (ता.१५) रोजी चर्चा करून बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावला जाईल. गावकऱ्यांनी सतर्क राहावे. गावात वन खात्याचे कर्मचारी जनजागृती करणार आहेत.

संभाजी गायकवाड, वनपाल, मंचर वनपरीक्षेत्र अधिकारी

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com