Pune Water Storage: पुणे जिल्ह्यातील २१ धरणांत ५० टक्क्यांपेक्षा कमी साठा

यंदा ‘एल निनो’मुळे मॉन्सून लांबणीवर जाण्याची शक्यता असून, जून-जुलै महिन्यांत समाधानकारक पाऊस पडणार नसल्याचा अंदाज आहे.
Water Stock
Water StockAgrowon

Pune Weather Update : यंदा ‘एल निनो’मुळे मॉन्सून (Monsoon) लांबणीवर जाण्याची शक्यता असून, जून-जुलै महिन्यांत समाधानकारक पाऊस पडणार नसल्याचा अंदाज आहे. त्यामुळे आतापासून उपलब्ध पाण्याचे नियोजन करण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहेत.

जिल्ह्यातील भीमा खोऱ्यातील २६ धरणांपैकी २१ धरणांमध्ये ५० टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा आहे. त्यामुळे पुढील चार महिने पिण्यासाठी तसेच शेतीला पाणी मिळेल, असे नियोजन पाटबंधारे विभागासह स्थानिक स्वराज्य संस्थांना करावे लागणार आहे.

Water Stock
Water Shortage : लघू प्रकल्पांतील ११ टक्के पाणीसाठा घटला

जिल्ह्यात उजनीसह लहान मोठ्या एकूण २६ धरणांतील उपयुक्त पाणीसाठ्याची क्षमता १९८.३४ टीएमसी एवढी आहे.

त्यापैकी धरणांत २०२.६७ टीएमसी म्हणजेच १०२ टक्के पाणीसाठा झाला होता. गेल्या पाच ते सहा महिन्यांत पाण्याचा वापर मोठ्या प्रमाणात झाला आहे. त्यामुळे धरणांत गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी पाणीसाठा शिल्लक आहे.

सध्या धरणांत ६३.९२ टीएमसी म्हणजेच अवघा ३२ टक्के पाणीसाठा असून, गेल्या वर्षी धरणांत आजपर्यंत ८९.०८ टीएमसी म्हणजेच ४४ टक्के पाणीसाठा होता. गेल्या वर्षीच्या तुलनेत धरणांत २५.१६ टीएमसी पाण्याची घट झाली आहे.

Water Stock
Water Shortage In Jalgaon : जळगावात जलसाठ्यात होऊ लागली झपाट्याने घट

सध्या खडकवासला,चासकमान, वीर, डिंभे, विसापूर, उजनी या धरणांतून पाण्याचा डाव्या, उजव्या कालव्याला पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. याचा वापर शेतीसाठी केला जात आहे. याशिवाय खडकवासला, पवना, गुंजवणी, भाटघर, नीरा देवघर या धरणांतून बंद जलवाहिनीद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. त्यामुळे धरणातील पाणीपातळी वेगाने कमी होत आहे.

सोमवार (ता. १७)पर्यंतचा धरणनिहाय उपयुक्त असलेला पाणीसाठा, टीएमसीमध्ये ः

धरण -- गेल्या वर्षीचा पाणीसाठा -- यंदाचा पाणीसाठा -- टक्केवारी

टेमघर --- ०.४७ -- ०.३१ -- ८

वरसगाव --- ५.७९ -- ७.३३ -- ४५

पानशेत --- ५.१९ -- ३.९६ -- ३७

खडकवासला --- ०.८४ -- १.०४ -- ५२

पवना --- ३.४७ -- ३.४६ -- ४०

कासारसाई --- ०.३२ -- ०.२४ -- ४२

कळमोडी --- ०.९० -- ०.८७ -- ५७

चासकमान --- ३.४६ --- २.४२ -- ३१

भामा आसखेड -- ४.२६ -- ३.४४ -- ४४

आंध्रा --- २.२५ -- १.९० -- ६५

वडिवळे --- ०.२५ -- ०.४२ -- ३९

शेटफळ -- ०.३६ -- ०.३१ -- ५०

नाझरे --- ०.०२ --- ०.२३ -- ३९

गुंजवणी --- १.७८ --- १.६८ -- ४५

भाटघर --- १३.६३ --- ७.०८ -- ३०

नीरा देवघर ---- ४.९७ -- ५.५३ -- ४७

वीर --- ५.६३ -- ५.०२ -- ५३

पिंपळगाव जोगे --- ०.३९ -- १.५० -- ३८

माणिकडोह --- ०.९९ -- १.२० -- ११

येडगाव --- ०.९७ --- ०.८९ -- ४५

वडज ---- ०.४९ --- ०.३६ -- ३०

डिंभे -- ३.३९ --- ४.६५ -- ३७

चिल्हेवाडी --- ०.२८ --- ०.४० -- ४९

घोड --- २.१५ -- १.३१ -- २६

विसापूर --- ०.१२ -- १.३१ -- २६

उजनी --- २७.६९ -- ८.१२ -- १५

मुळशी --- ४.३७ -- ६.५८ -- ३२

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com