Orchard Management : विठोली येथील कार्यशाळेत संत्रा उत्पादन, मार्केटिंगचे धडे

संत्रावर्गीय फळपिकांच्या उत्पादनात वाढ करण्यासाठी शास्त्रज्ञांच्या चमूमार्फत प्रयत्न केले जातात. जिल्ह्यात वडजीसारखे गाव संत्रा उत्पादनात अग्रेसर बनले आहे.

Orange Workshop
Orange WorkshopAgrowon

वाशीम : मानोरा तालुक्यात सुधारित शास्त्रीय तंत्रज्ञानावर आधारित फळबाग व्यवस्थापन (Orchard Management) करून चांगल्या दर्जाची ‘निर्यातक्षम’ संत्रा (Orange Export) फळे तयार करणे तसेच प्रभावी विपणनाच्या माध्यमातून अधिकाधिक उत्पन्न मिळवण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यासाठी विठोली येथे कृषी विज्ञान केंद्राच्या पुढाकाराने संत्रा उत्पादकांची कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी दोनशेहून अधिक संत्रा उत्पादक उपस्थित होते.

कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. आर. एल. काळे, कृषी अर्थशास्त्रज्ञ डॉ. डी. एन. इंगोले, फलोत्पादन शास्त्रज्ञ निवृत्ती पाटील, तालुका कृषी अधिकारी व्ही. के. घोडेकर, मंडळ कृषी अधिकारी जी. व्ही. जैताडे, पंचायत समिती सदस्य गोपाल भोयर, वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार प्राप्त शेतकरी बाबाराव जामदार, रिसोड येथील वडजी गावचे प्रयोगशील संत्रा उत्पादक शेतकरी गोपाल बोरकर,

शिवाजी शेजूळ, आर्णी येथील शेतकरी श्री. चव्हाण, महिला बचत गट अध्यक्षा माधुरी कांबळे, कृषी विभागाचे मुकेश काळे, गोपाल ठाकूर, गणेश काळे, आशिष पाटील, नीलेश पाटील, स्वप्नील पाटील, अजय ढोक, संजय देशमुख, राहुल देशमुख, किशोर वानखडे, श्‍याम कोल्हे, मुंगशीराम उपाध्ये, विशाल ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

मंडळ कृषी अधिकारी गणेश जैताडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. डॉ. काळे यांनी सांगितले, की कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून विविध विषय तज्ज्ञांच्या क्षेत्रभेटी आयोजित केल्या जातात.


Orange Workshop
Agriculture Work : शेतीतील कष्ट सुरूच असतात

संत्रावर्गीय फळपिकांच्या उत्पादनात वाढ करण्यासाठी शास्त्रज्ञांच्या चमूमार्फत प्रयत्न केले जातात. जिल्ह्यात वडजीसारखे गाव संत्रा उत्पादनात अग्रेसर बनले आहे. आगामी काळात मानोरा तालुक्यात संत्रा फळपिकासाठी विशेष लक्ष देऊन काम केले जाईल.

दरम्यान, कृषी अर्थशास्त्रज्ञ डॉ. इंगोले यांनी संत्रा पिकाचे अर्थशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षा विषयी उपस्थिताना माहिती दिली.सूत्रसंचालन कृषी सहायिका बी. एस. चौढाळे यांनी केले. डी. जी. देशमुख यांनी आभार मानले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com