Rain Update : तुरळक ठिकाणी हलक्या सरी

चार ते पाच दिवसांपासून पावसाचा जोर ओसरला आहे. अनेक भागात पावसाने बऱ्यापैकी उघडीप दिली असली, तरी तुरळक ठिकाणी हलक्या सरी बरसत आहेत.
Pune Rain Update
Pune Rain UpdateAgrowon

पुणे : चार ते पाच दिवसांपासून पावसाचा जोर (Rain Intensity) ओसरला आहे. अनेक भागात पावसाने बऱ्यापैकी उघडीप दिली असली, तरी तुरळक ठिकाणी हलक्या सरी बरसत आहेत. बुधवारी (ता.२१) सकाळी आठ वाजेपर्यंत हवेली, मावळ, बारामती, दौड अशा तालुक्यांत काही ठिकाणी पावसाचा (Pune Rain Update) शिडकावा झाला आहे.

Pune Rain Update
Rain Update : खानदेशात पाऊस वाढला नुकसानीचे आकडेही वाढले; पंचनाम्यांबाबत स्पष्टता नाहीच

गेल्या आठवड्यात पावसाने चांगलीच दमदार हजेरी लावली. काही ठिकाणी जोरदार पाऊस पडला असून, घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस कोसळला होता. त्यामुळे ओढे, नाले तुडुंब भरून वाहिल्याने धरणांच्या पाणीपातळीत चांगलीच वाढ झाली होती. वरसगाव, पानशेत, खडकवासला, पवना अशा काही धरणांतून पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला होता.

त्यामुळे नद्याकाठी व ओढ्याच्या काठच्या शेतात पाणी शिरल्याने पिकांचे नुकसान झाले. तर काही ठिकाणी सतत पडणाऱ्या पावसामुळे भात, कांदा, टोमॅटो, बटाटा, पालेभाज्या, फळे अशा पिकांचेही चांगलेच नुकसान झाल्याने शेतकऱ्यांनी पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे.

सध्या पावसाची उघडीप असली तरी मागील काही दिवसांपासून सततच्या ढगाळ वातावरणामुळे पिकांवर कीड-रोगांचा प्रादुर्भाव वाढीस लागला आहे. सध्या विविध पिके वाढीच्या अंतिम टप्प्यात आहेत. या काळात बदलत्या वातावरणामुळे पिकांवर विपरित परिणाम होण्याची शक्यता अधिक असते. कीड-रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पिकांवर मोठ्या प्रमाणात फवारणी केली जाते. यामुळे खर्चात वाढ होऊन शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो. अनेक ठिकाणी जमिनीत अजूनही पाण्याची स्थिती कायम असून, त्यामुळे नुकसानीच्या प्रमाणात वाढ होताना दिसून येत आहे.

Pune Rain Update
Rain Update : विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाचा अंदाज

बुधवारी (ता. २१) सकाळी आठवाजेपर्यंत हवेलीतील शिवाजीनगर, केशवनगर, भोसरी, चिंचवड, मुळशीतील माले, मावळमधील वडगाव मावळ, काळे, कार्ला, खडकाळा, लोणावळा, शिवणे, वेल्ह्यातील पानशेत, जुन्नरमधील राजूर, खेडमधील वाडा, राजगुरुनगर, कुडे, बारामतीतील माळेगाव, बारामती शहर, पनदरे, वडगाव, लोणी भापकर, सुपा, मोरगाव, उंडवडी, इंदापुरातील लोणी, निमगाव केतकी, दौंडमधील पाटस, यवत, केडगा, वरवंड या भागांत पावसाच्या बऱ्यापैकी सरी बरसल्या.

सर्वच धरणे ‘ओव्हर फ्लो’

आतापर्यंत झालेल्या पावसामुळे जवळपास सर्वच धरणे भरून वाहत आहे. त्यामुळे टेमघर, वरसगाव, पानशेत, खडकवासला, पवना, कासारसाई, चासकमान, भामा आसखेड, आंध्रा, वडिवळे, नाझरे, गुंजवणी, भाटघर, नीरा देवघर, पिंपळगाव जोगे, येडगाव, वडज, चिल्हेवाडी, घोड, विसापूर, उजनी या धरणांतून विसर्ग अजूनही सुरू आहे. यामुळे मुळा, पवना, भीमा, भामा, इंद्रायणी, कऱ्हा, कानंदी, कुकडी, मीना, घोड या नद्या अजूनही दुथडी भरून वाहत आहेत.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com