Rain Forecast : तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज

राज्याच्या विविध भागांत दोन-तीन दिवसांपासून वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. राज्यात सुरू असलेला पाऊस काहीशी उघडीप देण्याची शक्यता आहे.
Rain Update
Rain UpdateAgrowon

पुणे : राज्याच्या विविध भागांत दोन-तीन दिवसांपासून वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने (Heavy Rain) हजेरी लावली. राज्यात सुरू असलेला पाऊस काहीशी उघडीप देण्याची शक्यता आहे. आज (ता. ३) तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा, तसेच कमाल तापमान (Temperature) आणि उकाड्यातील वाढ (Heat) कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने (Weather Department) वर्तविला आहे.

Rain Update
Rain Alert : राज्यात ठिकठिकाणी पावसाचा इशारा !

मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा सर्वसाधारण स्थितीत आला असून, अमृतसरपासून अंबाला, बरेली, मालदा, नागालॅण्ड ते आसामपर्यंत विस्तारला आहे. उत्तर तमिळनाडू आणि परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती लक्षद्वीप बेटे आणि लगतच्या अरबी समुद्राकडे सरकली असून, त्याला लागून ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. या चक्राकार वाऱ्यापासून कोकण, मध्य महाराष्ट्र, मध्य प्रदेशपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे.

राज्यात उन्हाचा चटका आणि उकाडा कायम असून, मध्य महाराष्ट्र, विदर्भात काही ठिकाणी विजा, मेघगर्जनेसह मुसळधार पावसाने दणका दिला आहे. नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथे सर्वाधिक १७० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

Rain Update
Rain Update : पाच जिल्ह्यातील २७९ पैकी २५९ मंडलांत पाऊस

शुक्रवारी (ता. २) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये (स्रोत : हवामान विभाग) :

कोकण : खेड ३०, मुरबाड २०.

मध्य महाराष्ट्र : सिन्नर १७०, जामनेर, अकोले, एरंडोल प्रत्येकी ५०, मालेगाव ४०, बोधवड, त्र्यंबकेश्‍वर, पन्हाळा, देवळा, आक्रणी, कागल प्रत्येकी ३०, नाशिक, कडेगाव, शिरोळ, गडहिंग्लज, संगमनेर, इगतपुरी, जत, कवठे महाकाळ, बार्शी, राधानगरी, माढा प्रत्येकी २०.

मराठवाडा : औसा, भोकरदन प्रत्येकी ८०, खुलताबाद, औरंगाबाद, पाटोदा प्रत्येकी ५०, जाफराबाद, भूम प्रत्येकी ४०, शिरूर कासार, सिल्लोड, निलंगा प्रत्येकी ३०, निलंगा, केज, अंबेजोगाई, रेणापूर, बदनापूर, कळंब प्रत्येकी २०.

विदर्भ : बुलडाणा ५०, नेर, चांदूर रेल्वे, नांदूरा, मातोळा प्रत्येकी ३०, तेल्हारा, शेगाव, खामगाव, धामणगाव रेल्वे, तिवसा, वरोरा, मंगरूळपीर, कळमेश्‍वर प्रत्येकी २०.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com