Weather Update : मराठवाड्यात हलक्या पावसाचा अंदाज !

राज्याच्या बहुतांशी भागांमध्ये पावसाची उघडीप कायम आहे. सोमवारी राज्यातील काही भागांमध्ये हलका पाऊस झाला.
Weather Update
Weather UpdateAgrowon

राज्याच्या बहुतांशी भागांमध्ये पावसाची (Rain Update) उघडीप कायम आहे. सोमवारी राज्यातील काही भागांमध्ये हलका पाऊस (Light Rain) झाला. तर हवामान विभागानं (Weather Department) उद्या सकाळपर्यंत राज्यातील काही ठिकाणी विजांसह हलका पाऊस होईल असा अंदाज (Rain Forecast With Lightning) व्यक्त केलाय.

कोकणात सोमवारी अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी पडल्या. रायगड जिल्ह्यातील मुरुड मंडळात ६० मिलिमीटर तर श्रीवर्धन मंडळात ४० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तसचं म्हसला, तळा, मानगाव, रोहा आणि माथेरान या मंडळांमध्ये हलक्या सरी झाल्या.

Weather Update
Rain Update : खडकवासला, पानशेत, वरसगाव धरणांतील पाण्याचा विसर्ग बंद

रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा येथे ४० मिलिमीटर तर दोपाली, हरणे, राजापूर, गुहागर, संगमेश्वर, मंडणगड, माथेरान आणि चिपळून मंडळांंमध्ये हलक्या पावसानं हजेरी लावली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात ही काही मंडळांध्ये काही वेळ पावसाच्या सरी झाल्या. मात्र पावसाचा जोर कमीच होता.

Weather Update
Rain News : अकोलखेड केंद्रावरील पाऊस नोंदींचा अचूक अहवाल मागविला

मध्य महाराष्ट्रात मात्र पावसाची उघडीप कायम होती. काही ठिकाणी पावसाचा शिडकावा झाला. सातारा जिल्ह्यातील पाटण आणि महाबळेश्वर या मंडळांत पावसानं हजेरी लावली. तर कोल्हापूर जिल्ह्यातील गगणबावडा आणि राधानगरी मंडळात तसचं पुणे जिल्ह्यातील वेल्हे मंडळात पावसाचा शिडकावा झाला.

मराठवाड्यात काही ठिकाणी पावसानं हेजेरी लावली मात्र पावसाचा जोर कमीच होता. विदर्भातही आज पावसाचा जोर नव्हता. बहुतांशी ठिकाणी पावसानं विश्रांती दिली होती. तर तुरळक ठिकाणी पावसाचा शिडकावा झाला.

गोंदीया जिल्ह्यातील सालेकसा, गोरेगाव, गोंदीया आणि देवरी या मंडळांमध्ये हलक्या सरी पडल्या. तर भंडारा जिल्ह्यातील तुमसर आणि चंद्रपूर जिल्ह्यातील पोम्बुर्णा या मंडळांमध्ये पावसाचा शिडकावा झाला.

हवामान विभागानं उद्या सकाळपर्यंत मध्य महाराष्ट्रातील पुणे, सांगली, सोलापूर, नगर, धुळे आणि जळगाव जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज व्यक्त केलाय. तर मराठवाड्यातील जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर, परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात काही ठिकाणी विजांसह पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com