Weather Update : राज्यात ढगाळ हवामानासह हलक्या पावसाचा अंदाज

राज्याच्या अनेक भागांत पावसाने उघडीप दिल्याने कमाल तापमानात वाढ होऊन उकाड्यातही मोठी वाढ झाली आहे.
Rain Updates
Rain UpdatesAgrowon

पुणे : राज्याच्या अनेक भागांत पावसाने उघडीप दिल्याने कमाल तापमानात वाढ (Temperature Increased) होऊन उकाड्यातही मोठी वाढ झाली आहे. आज (ता. ३०) पूर्व विदर्भात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता (Rain Forecast With Lightning) आहे. तर उर्वरित राज्यात ढगाळ हवामानासह (Cloudy Weather) हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने (Weather Department) वर्तविला आहे.

Rain Updates
Weather Update : पावसाच्या उघडिपीची शक्यता

मॉन्सूनचा आस असलेल्या कमी दाबाचा पट्टा उत्तरेकडे गेला असून, पुढील तीन ते चार दिवस तो उत्तरेकडेच राहणार आहे. हा आस फिरोजपूरपासून ईशान्य भारतातील मिझोरामपर्यंत विस्तारला आहे. उत्तर कर्नाटकपासून कोमोरिन भागापर्यंत हवेचा दक्षिणोत्तर कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. तमिळनाडू आणि परिसरावर तसेच बंगालच्या उपसागरात चक्राकार वाऱ्यांची स्थिती कायम आहे.

Rain Updates
काय तो पाऊस, काय ते बेड, काय ती पिकं, सगळं ओकेमधे...

राज्याच्या अनेक भागात पावसाने उघडीप दिली असून, ऊन-सावल्यांचा लपंडाव सुरू आहे. अधूनमधून डोकावणाऱ्या सूर्यामुळे उन्हाचा चटका जाणवत आहे. राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते जोरदार पावसाच्या सरी कोसळत आहेत. सोलापूर, सातारा, पुणे, नांदेड, जालना जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली. आज (ता. ३०) पूर्व विदर्भात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता आहे.

विजांसह पावसाची शक्यता (येलो अलर्ट) :

विदर्भ : नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली.

राज्यात शुक्रवारी (ता. २९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये (स्रोत : हवामान विभाग) :

कोकण : संगमेश्‍वर ४०, ठाणे २०.

मध्य महाराष्ट्र : माढा ७०, इंदापूर, जावळीमेढा, कर्जत, जेऊर प्रत्येकी ४०, साक्री, पाटण प्रत्येकी ३०, वाई, शिरूर, शाहूवाडी, पाथर्डी, कसबेडिग्रज, दौंड प्रत्येकी २०.

मराठवाडा : भोकर, अंबड प्रत्येकी ७०, परभणी, उमरी, परांडा, पाथरी प्रत्येकी ३०, हिमायतनगर, पातूर, माणवत, जिंतूर, सेनगाव, भूम प्रत्येकी २०

विदर्भ : लाखंदूर, झारीझामणी, रामटेक प्रत्येकी २०.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com