‘उजनी, घोड’च्या पाणलोट क्षेत्रात हलका पाऊस

जोरदार पावसाची प्रतीक्षा; पेरण्या खोळंबल्या
‘उजनी, घोड’च्या पाणलोट क्षेत्रात हलका पाऊस
Rain UPdateAgrowon

पुणे ः ‘‘गेल्या दोन ते तीन दिवसांपासून पावसासाठी पोषक (Rain) वातावरण आहे. गुरुवारी (ता. ९) सकाळी आठ वाजेपर्यंत जिल्ह्यात धरणाच्या पाणलोट क्षेत्रात (Dam Catchment Area) विजांच्या कडकडाटासह पावसाच्या (Light Rain) हलक्या सरी पडल्या. उजनी, घोड, डिंभे, विसापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात (Ujani Dam Catchment Area) काहीसा चांगला पाऊस झाल्याची नोंद जलसंपदा विभागाकडे झाली आहे.

जिल्ह्यातील काही भागांत अधूनमधून पाऊस पडत आहे. प्रामुख्याने पूर्व पट्ट्यातील शिरूर, दौंड, इंदापूर, बारामती भागांत वादळी वाऱ्यासह कमीअधिक स्वरूपात पाऊस पडत आहे. बुधवारी (ता. ७) सायंकाळी जिल्ह्यातील पूर्व व पश्‍चिम भागात चांगलाच पाऊस झाला. पूर्व भागाला उन्हाळ्यात जीवनदायी ठरणाऱ्या धरण पट्ट्यात पावसाचा प्रभाव वाढला आहे. उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जवळपास ३१ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली. घोड धरणाच्या पाणलोट क्षेत्रात १४, डिंभे ६, विसापूर ५, नाझरे १ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली. इतर भागातही पावसाच्या तुरळक सरी पडल्या. शेतकरी अजूनही जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे.

खरीप पेरणीसाठी दिलासा मिळणार असल्याने शेतकऱ्यांनी शेतीकामांना वेगाने सुरुवात केली आहे. काही ठिकाणी पिकांच्या पेरणीसाठी हा पाऊस पोषक नसल्याचे मत शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे. जिल्ह्याच्या पश्‍चिम भागातील मावळ, मुळशी, भोर, वेल्हा या तालुक्यांत पावसाचा जोर कमी आहे. उत्तरेकडील जुन्नर, आंबेगाव, खेड तालुक्यांत पाऊस नाही. पूर्वेकडील तालुक्यातील शिरूर, दौंड, हवेली, पुरंदर, बारामती, इंदापूर या तालुक्यांत पावसाचा जोर कमी अधिक आहे. काही ठिकाणी जोरदार पाऊस पडला आहे.

धरणाच्या पाणलोटात एक ते ९ जूनदरम्यान झालेला पाऊस (मि.मी) :

येडगाव १७, डिंभे ६, घोड १४, विसापूर ८, चिल्हेवाडी १, चासकमान २०, भामा आसखेड १९, पवना २, नाझरे ३०, उजनी ४७

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com