Maharashtra Rain Alert: राज्यात हलका पाऊस

मॉन्सूनचा (Monsoon) पाऊस सक्रिय असल्याने राज्याच्या विविध भागात दमदार पावसाने हजेरी लावली. कोकणातील पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसह घाटमाथ्यावर संततधार पाऊस पडला.
Rain Updates
Rain UpdatesAgrowon

पुणे : राज्यात धुव्वाधार बरसणाऱ्या काहीशी उसंत घेतली आहे. राज्यात ढगाळ हवामानासह हलक्या ते जोरदार पाऊस पडत आहे. शनिवारी (ता. १६) सकाळपर्यंत कोकणासह घाटमाथ्यावर पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. तर उर्वरित राज्यात हलक्या ते मध्यम सरींनी हजेरी लावली.

मॉन्सूनचा (Monsoon) पाऊस सक्रिय असल्याने राज्याच्या विविध भागात दमदार पावसाने हजेरी लावली. कोकणातील पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसह घाटमाथ्यावर संततधार पाऊस पडला. काही ठिकाणी जोरदार सरी बरसत होत्या. शनिवारी (ता.१६) राज्यात अनेक ठिकाणी पावसाने उघडीप दिली असून, सूर्यदर्शन झाले.

मराठवाड्यात उघडीप

मध्य महाराष्ट्रात कोल्हापूर, नाशिक, पुणे, सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेकडील तालुक्यात पावसाचा रिपरिप सुरूच होती. धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही पावसाची संततधार सुरू असल्याने पाणीसाठ्यात वाढ होत आहे. मराठवाड्यात पावसाने उघडीप दिली आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस झाल्याचे हवामान विभागातर्फे (IMD) सांगण्यात आले.

शनिवारी (ता. १६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये (स्रोत : हवामान विभाग)

कोकण :

पालघर : डहाणू ५५, जव्हार १०८, मोखाडा ५८, तलासरी ६५.

रायगड : कर्जत ५८, खालापूर ६०, महाड ५१, माथेरान ८२, पोलादपूर ५७, रोहा ११२,

रत्नागिरी : दापोली ८१, खेड ८२, लांजा ५४, मंडणगड ६५.

सिंधुदुर्ग : दोडामार्ग ५३, कुडाळ ५८, सावंतवाडी ६५.

ठाणे : मुरबाड ६८.

मध्य महाराष्ट्र :

कोल्हापूर : आजरा ८६, चंदगड ७६, गगनबावडा १०२, पन्हाळा ५०, राधानगरी १००, शाहूवाडी ६७.

नाशिक : हर्सूल ६०, इगतपुरी ११८, ओझरखेडा ७३, पेठ ८६. त्र्यंबकेश्वर ५६.

पुणे : लोणावळा कृषी १४३, वेल्हे ९२.

सातारा : जावळीमेढा ८४, महाबळेश्वर १५१.

विदर्भ :

चंद्रपूर : चिमूर ४०.

गडचिरोली : आरमोरी ४६,

गोंदिया : आमगाव ३८, गोंदिया ३२.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com