Rain : जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या सरी

उघडिपीनंतर पुन्हा पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. पुणे जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या सरी बरसत आहेत.
Rain Update
Rain UpdateAgrowon

पुणे : उघडिपीनंतर पुन्हा पावसासाठी (Rainfall) पोषक वातावरण तयार झाले आहे. पुणे जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या सरी बरसत आहेत. बुधवारी (ता. २४) लोणावळ्यात सर्वाधिक ७० मिलिमीटर पाऊस (Pune Rain Update) पडल्याची नोंद झाली. या पावसामुळे खरिपातील पिकांना (Kharif Crop) काही प्रमाणात दिलासा मिळाल्याने पिकांची वाढ जोमदारपणे सुरू आहे.

Rain Update
Rain : पावसाच्या उघडिपीमुळे धरणांतून विसर्ग घटविला

गेल्या आठ ते दहा दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. त्यामुळे शेतामध्ये वाफसा स्थिती आहे. काही ठिकाणी खुरपणीचे कामे वेगाने सुरू आहेत. परंतु पश्‍चिम पट्ट्यात पावसाच्या तुरळक सरी पडत आहे. भात खाचरे पावसाने भरली असल्याने भात रोपांची वाढही चांगली आहे. मुळशी तालुक्यातील माले येथे २८ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली. तर पौड ११, घोटावडे १७, मुठे २० मिलिमीटर पाऊस पडला. हवेलीतील पुणे वेधशाळा, खडकवासला, भोसरी, चिंचवड या भागांतही हलक्या सरी कोसळल्या असून, थेऊर, उरुळीकांचन, खेड, केशवनगर, कोथरूड, कळस, हडपसर, वाघोली भागांत ढगाळ वातावरण होते.

Rain Update
Crop Damage : अतिवृष्टीने शेतीसह पिकांची दैना

भोरमधील निगुडघर येथे १५, भोलावडे ११, आंबवडे १२ मिलिमीटर पाऊस पडला. तर संगमनेर, नसरापूर, किकवी, वेळू भागांत ढगाळ हवामान होते. मावळमधील वडगाव मावळ १२, काले ३२, कार्ला ५२, खडकाळा ३२, शिवणे १६ मिलिमीटर पाऊस पडला. वेल्ह्यातील पाणशेत येथे १९ मिलिमीटर तर वेल्हा, विंझर, आंबवणे भागात ढगाळ वातावरण होते. जुन्नरमधील राजूर येथे २२ मिलिमीटर, तर नारायणगाव, वडगाव निमगाव सावा, बेल्हा, डिंगोरे, आपटाळे भागांत हलक्या सरी पडल्या. खेडमधील कुडे येथे १४ मिलिमीटर, तर वाडा, राजगुरुनगर, पाईट, चाकण भागांत हलका पाऊस पडला. तर आळंदी, पिंपळगाव, कन्हेरसर, कडूस या भागांत पाऊस पडला नाही.

आंबेगावमधील घोडेगाव, आंबेगाव, पारगाव, शिरूरमधील मलठण, कोरेगाव, पाबळ या भागांतही तुरळक सरी बरसल्या. तर बारामतीतील माळेगाव, पणदरे, वडगाव, लोणी, सुपा, मोरगाव, उंडवडी, इंदापुरातील भिगवण, इंदापूर, लोणी, बावडा, काटी, निमगाव, अंथुर्णी, सणसर. दौंडमधील देऊळगाव, पाटस, यवत, कडेगाव, राहू, वरवंड, रावणगाव, दौंड, पुरंदरमधील सासवड, भिवंडी, कुंभारवळण, जेजुरी, परिंचे, राजेवाडी, वाल्हा या भागात अंशतः ढगाळ वातावरण होते. तर काही ठिकाणी अधूनमधून ऊन पडत होते.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com