Pune Rain : पुणे जिल्ह्यात पावसाच्या हलक्या सरी

गेले काही दिवस पावसाने दमदार हजेरी लावल्यानंतर पावसाचा जोर काहीसा कमी झाला आहे.
Rain Update
Rain Update Agrowon

पुणे : गेले काही दिवस पावसाने दमदार हजेरी (Heavy Rain In Pune) लावल्यानंतर पावसाचा जोर काहीसा कमी झाला आहे. पुणे जिल्ह्यातील पश्चिम पट्ट्यात काही ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस (Pune Rain Update) पडत असला तरी अनेक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी बरसत आहेत. त्यामुळे शेतीकामांना (agriculture Work) काही प्रमाणात वेग आला आहे.

Rain Update
पुणे विभागात उन्हाळी सोयाबीनची २ हजार हेक्टरवर पेरणी

जिल्ह्यात सोमवारी (ता.१८) सकाळी आठ वाजेपर्यंत सात मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली. यामध्ये मुळशी तालुक्यात २४.५० मिलिमीटर पाऊस पडला. दौड आणि बारामती तालुक्यांत पाऊस न पडल्याची नोंद झाली. तर, शिरूर, इंदापूर या तालुक्यांत तुरळक सरी पडल्या असून खरिपातील पिकांना दिलासा मिळाला आहे. मागील दोन ते तीन दिवसांपासून पावसाने काहीशी उघडीप दिली असली तरी अधूनमधून ऊन पडत असल्याने शेत वाफसा अवस्थेत आले आहे.

Rain Update
पुणे जिल्ह्यात हलका पाऊस

पश्चिम पट्ट्यातील मुळशीतील मुठा मंडळात सर्वाधिक ५० मिलिमीटर पाऊस पडला. थेरगाव, पिरंगुट येथे हलक्या सरी बरसल्या. भोरमध्येही पावसाचा बऱ्यापैकी जोर होता. तर नसरापूर, किकवी, वेळू या भागांत हलका पाऊस पडला. मावळमधील लोणावळ्यात ३५ मिलिमीटर पाऊस पडला असून तळेगाव, वडगाव मावळमध्ये तुरळक सरी बरसल्या. वेल्ह्यातही मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. उत्तरेकडील जुन्नरमधील राजूर येथे मध्यम, तर डिंगोरे, जुन्नरमध्ये तुरळक पाऊस पडला. नारायणगाव, वडगाव आनंद, निमगाव सावा, बेल्हा, आपटाळे, ओतूर या भागांत ढगाळ वातावरण होते. खेडमध्येही वाडा, पाईट, चाकण, पिंपळगाव, कन्हेरसर, कडुस भागांत तुरळक सरी पडल्या. तर राजगुरुनगर, आळंदी भागांत ढगाळ वातावरण कायम होते. हवेलीतही पुणे वेधशाळा, केशवनगर, कोथरूड, खडकवासला, थेऊर, खेड, चिंचवड, कळस या भागांत हलक्या सरी बरसल्या. तर, हडपसर, वाघोली, उरुळीकांचन भागांत ढगाळ वातावरण होते.

आंबेगावमध्येही घोडेगाव, आंबेगाव, कळंब येथे तुरळक, तर पारगाव, मंचर या भागांत पावसाने उघडीप घेतली. शिरूरमधील कोरेगाव, इंदापुरातील इंदापूर शहर, पुरंदरमधील सासवड, जेजुरी, परिंचे भागांत हलक्या सरी पडल्या. उर्वरित भागात पावसाने काहीशी उघडीप दिली होती.

सोमवारी (ता.१८) सकाळी आठ वाजेपर्यंत झालेला पाऊस, मिलिमीटरमध्ये :

हवेली - भोसरी १२,

मुळशी - पौड १५, घोटावडे ३०, माले ४२,

भोर - भोर १२, भोलावडे २८, आंबवडे १९, संगमनेर २१, निगुडघर ३३

मावळ - काळे २०, कार्ला २७, खडकाळा २३, लोणावळा ३५, शिवणे १५

वेल्हा - वेल्हा २४, पानशेत २३, विंझर २०, आंबवणे १७

जुन्नर - राजूर २२,

खेड - कुडे ११, ,

पुरंदर - भिवडी १०,

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com