Rain Update : राज्यात काही ठिकाणी हलक्या सरी!

राज्यात पावसानं गुरुवारीही उघडीप दिली. बहुतांश भागांत पावसाने विश्रांती घेतली. मात्र तुरळक ठिकाणी जोरदार तर काही भागांत हलक्या पावसानं हजेरी लावली.
Rain Update
Rain UpdateAgrowon

पुणेः राज्यात पावसानं गुरुवारीही उघडीप (Rain Update Maharashtra) दिली. बहुतांश भागांत पावसाने विश्रांती घेतली. मात्र तुरळक ठिकाणी जोरदार (Heavy Rain) तर काही भागांत हलक्या पावसानं हजेरी लावली. हवामान विभागानं (Weather Department) उद्या सकाळपर्यंत विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदीया जिल्ह्यात जोरदार पावसाचा येलो अलर्ट दिला (Heavy Rain Yellow Alert). तर राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज व्यक्त केला.

कोकणात अनेक भागांत पावासाने उघडीप दिली. त्यामुळे शेतकऱ्यांनी आंबा, काजू या फळझाडांना खते देण्यास सुरुवात केली. तर काही ठिकाणी भातरोप लागवडीच्या कामांना वेग आलाय. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड आणि पालघर जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाच्या सरी झाल्या. मात्र बहुतेक भागात पाऊस नव्हता.

Rain Update
Fertilizer Price Hike: खते महागल्यामुळे भात लागवड घटली?

कोल्हापूर जिल्ह्यातही पावसाचा जोर थांबला. त्यामुळं महापुराची भीतीही कमी झाली. काही ठिकाणी अधूनमधून हलक्या सरी पडतायेत. मात्र जोर कमी आहे. त्यामुळं नवीन ऊस लावणीत शेतकऱ्यांनी लक्ष घातलंय. पुणे जिल्ह्यातही पावसानं विश्रांती घेतली.पश्चिम पट्यातही मावळ वगळता मुळशी, भोर, वेल्हा, नगर जिल्ह्यातील मुळा पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळं कुमशेत परिसरातील गावांचा व आठ वाड्यांचा संपर्क तुटलाय. रस्ता फुटला, बांध फुटला, शेतांना ओढ्यांचे स्वरूप प्राप्त झालंय. विदर्भातही अनेक भागांत पावसानं उघडीप दिलीये. पूर्व विदर्भात काही ठिकाणी पाऊस झाला. मात्र पावसाचं प्रमाण कमी होतं. यवतमाळ जिल्ह्यात अतिवृष्टी व पुरामुळं सव्वालाख हेक्टरवरील शेतपिकांचे नुकसान झालंय. तर अमरावती जिल्ह्यात जवळपास ३०० किलोमीटरचे रस्ते खरडून गेले. शिवाय लहान-मोठे ८० पूल वाहून गेले.

Rain Update
Rain Update : धरणक्षेत्रात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस

मराठवाड्यातही औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद आणि लातूर जिल्ह्यांत पावसाची उघडीप होती. तर काही ठिकाणी हलका पाऊस झाला. नांदेड जिल्ह्यात मात्र पावसाने बुधवारी सायंकाळी जोरदार सुरुवात केली. हा पाऊस जिल्ह्याच्या सर्वच भागात झाला. सततच्या पावसामुळे पिके पिवळी पडून वाढ खुंटली आहे, परिणामी, शेतकऱ्यांची चिंता वाढल्याचे दिसून येत आहे. परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांतही काही भागांत हलका पाऊस झाला.

पावसाचा जोर कमी झाल्यानं शेतकऱ्यांनी आता पेरण्या आणि पिकांच्या आंतरमशागतीच्या कामांना वेग दिलाय. काही भागांत होणाऱ्या हलक्या सरींमुळे कामात व्यत्ययही येतोय. हवामान विभागानं आज पूर्व विदर्भात जोरदार पावसाचा येलो अलर्ट दिलाय.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com