Pune Rain Update : जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वाऱ्यासह हलक्या सरी

गेल्या तीन ते चार दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण तयार झाले आहे.
Rain Update
Rain Update Agrowon

Rain Update Pune : गेल्या तीन ते चार दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण (Cloudy Weather) तयार झाले आहे. जिल्ह्यातील बहुतांश भागात मागील दोन दिवसांपासून पावसाच्या सरी (Rainfall) पडत आहेत.

जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वऱ्यासह हलका पाऊस (Rain Update) झाला तर शहरात अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलका पाऊस झाला. या पावसामुळे शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडत असून गहू, हरभरा पिके काढण्यासाठी (Crop Harvesting) लगबग सुरू झाली आहे.

जिल्ह्यात मंगळवारी (ता. १४) सायंकाळी हवेली तालुक्याच्या पूर्व भागात तुरळक सरी पडल्या. तर बुधवारी (ता. १५) सकाळपासून ढगाळ वातावरणमुळे झाकाळलेले होते.

परंतु सकाळी दहानंतर वातावरणात पुन्हा काहीसा बदल होऊन दुपारी चांगलेच कडक ऊन पडले. तर सायंकाळी सहानंतर अचानक वातावरणात पुन्हा बदल होऊव काळे ढग भरून आले.

हवेली तालुक्यातील वारजे, धायरी, प्रभात रोड, डीपी रोड, म्हात्रे ब्रीज, पौडरोड, ब्रेमेन चौक, भुसारी कॉलनी, धनकवडी, सिंहगड रोड या भागांत विजांच्या कडकडाट आणि जोरदार वाऱ्यासह तुरळक हलका पाऊस पडला.

वारजे भागात गारांचा वर्षाव झाला. पावसामुळे काही भागांत वीजसुद्धा गायब झाली होती. पावसामुळे पुणे शहारात काही ठिकाणी वाहतूककोडी झाली. तर मावळ तालुक्यातही काही ठिकाणी हलका पाऊस पडला.

दौंड, बारामती, इंदापूर, पुरंदर, भोर, वेल्हा, खेड, जुन्नर, आंबेगाव, मुळशी या तालुक्यांतही ढगाळ वातावरण तयार झाले होते.

यामुळे शेतात उभ्या असलेल्या गहू, हरभरा पिके काढणीसाठी शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला होता.

आहे तसे पीक पदरात पाडून घेण्यासाठी चांगलीच लगबग सुरू झाली आहे. मजुरांच्या टंचाईने सोंगणीऐवजी हार्वेस्टरने खळे करण्यास शेतकरी पसंती देत आहेत.

परिणामी यंत्राच्या शोधासाठी रोजच झुंबड पाहण्यास मिळत आहे. मागील आठवड्यातही मावळ, हवेली, खेड तालुक्यांच्या काही भागांत काही प्रमाणात रिमझिम पाऊस पडला होता. त्यामुळे शेतकऱ्यांची पिके काढणीसाठी चांगलीच धावपळ सुरू झाली होती.

त्यानंतर पाच ते सहा दिवस वातावरण स्वच्छ झाल्यानंतर पुन्हा ढगाळ वातावरण तयार झाल्याने पिके काढणीला वेग आला आहे. एकाचवेळी सर्वांची धावपळ सुरू झाल्याने हार्वेस्टरचा तुडवडा भासत आहे. तर काही ठिकाणी बाहेरच्या तालुक्यातून यंत्र आणून हरभरा, गहू, ज्वारी पीक पदरात पाडून घेतले जात आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com