Weather Update : राज्यात हलका ते जोरदार पाऊस होण्याची शक्यता

राज्यात पावसाचा जोर कमी- अधिक असला तरी पावसाची संततधार सुरूच आहे. आज (ता. ९) कोकण आणि मध्य महाराष्ट्राचा घाटमाथा, चंद्रपूर येथे मुसळधार पावसाचा इशारा कायम आहे.
Rain Update
Rain UpdateAgrowon

पुणे : राज्यात पावसाचा जोर कमी- अधिक असला (Rainfall In Maharashtra) तरी पावसाची संततधार सुरूच आहे. आज (ता. ९) कोकण आणि मध्य महाराष्ट्राचा घाटमाथा, चंद्रपूर येथे मुसळधार पावसाचा इशारा (Heavy Rainfall Forecast) कायम आहे. तर उर्वरित विदर्भ आणि पूर्व मराठवाड्यात जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने (Weather Department) वर्तविली आहे.

Rain Update
Rain Update : राज्यात कुठे झाला धुव्वांधार पाऊस?

दक्षिण पाकिस्तान आणि परिसरावरील कमी दाबाचे क्षेत्र निवळून गेले. राजस्थान आणि परिसरावर चक्राकार वारे वाहत आहेत. ओडिशा आणि आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यालगत नव्याने चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार झाली आहे. मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा सर्वसाधारण स्थितीच्या दक्षिणेकडेच आहे. राजस्थानच्या जैसलमेरपासून बंगालच्या उपसागरापर्यंत विस्तारला आहे. गुजरात पासून ते कर्नाटक पर्यंत पश्चिम किनाऱ्याला समांतर हवेचा कमी दाबाचा पट्टा कायम आहे. दक्षिण महाराष्ट्रामध्ये ३.१ ते ५.८ किलोमीटर उंचीवर पूर्व-पश्चिम दिशेने वाहणाऱ्या परस्पर विरोधी वाऱ्यांचे जोड क्षेत्र तयार झाले आहे. त्यामुळे कोकण, घाटमाथ्यावर पावसाचा जोर कायम आहे.

आज (ता. ९) कोकणातील रायगड, रत्नागिरीसह पुणे, सातारा जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर अतिजोरदार पावसाचा इशारा (रेड अलर्ट) आहे. तर पालघर, मुंबई, ठाणे, सिंधुदुर्ग, चंद्रपूरसह कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) आहे. पूर्व मराठवाडा आणि विदर्भातही तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

अतिजोरदार पावसाचा इशारा (रेड अलर्ट) :

रायगड, रत्नागिरी, सातारा, पुणे.

जोरदार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) :

पालघर, मुंबई, ठाणे, सिंधूदुर्ग, नाशिक, कोल्हापूर, चंद्रपूर

जोरदार पावसाचा इशारा (यलो अलर्ट) :

उस्मानाबाद, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड, बुलडाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, वाशीम, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com