Rain : हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता

या आठवड्यात महाराष्ट्राच्या उत्तर भागावर १००४ ते १००६ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहील. त्यामुळे कोकणात चांगल्या तर उत्तर महाराष्ट्रात धुळे व जळगाव जिल्ह्यात हलक्या आणि नाशिक व नंदूरबार जिल्ह्यात चांगल्या पावसाची शक्यता आहे.
Rain Updates
Rain UpdatesAgrowon

या आठवड्यात महाराष्ट्राच्या उत्तर भागावर १००४ ते १००६ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहील. त्यामुळे कोकणात चांगल्या तर उत्तर महाराष्ट्रात धुळे व जळगाव जिल्ह्यात हलक्या (Light Rainfall) आणि नाशिक व नंदूरबार जिल्ह्यात चांगल्या पावसाची शक्यता (Maharashtra Rain Forecast) आहे. मराठवाड्यातील ८ जिल्ह्यांत हलक्या पावसाची शक्यता आहे. पश्‍चिम, मध्य व पूर्व विदर्भात हलक्या ते मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता (Rain Possibility In vidarbh) आहे. दक्षिण-पश्‍चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यात चांगल्या पावसाची शक्यता असून, पुणे जिल्ह्यात (Pune Rain Update) मध्यम स्वरूपात तर इतर जिल्ह्यांत हलक्या पावसाची शक्यता आहे. याप्रकारचे हवामान ३० जुलैपर्यंत राहण्याची शक्यता आहे. या आठवड्यात देखील काही भागांत आकाश पूर्णतः ढगाळ राहणे शक्य आहे.

कोकण ः

रत्नागिरी व रायगड जिल्ह्यांत आज व उद्या ६० ते ६५ मि.मी. पावसाची शक्यता राहील. सिंधुदुर्ग जिल्ह्यात ४५ मि.मी., ठाणे जिल्ह्यात ५५ मि.मी. व पालघर जिल्ह्यात ३० ते ५० मि.मी. पावसाची शक्यता आहे. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून आणि ताशी वेग ११ ते १४ किमी राहील. सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत कमाल तापमान ३० अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २३ ते २४ अंश सेल्सिअस राहील. रायगड, ठाणे व पालघर जिल्ह्यांत कमाल तापमान २९ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २५ ते २६ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ७४ ते ८० टक्के राहील.

Rain Updates
Crop Damage : संततधार पाऊस, पुरामुळे ३३ हजार हेक्टरला फटका

उत्तर महाराष्ट्र ः

नाशिक जिल्ह्यात आज व उद्या ४१ ते ४५ मि.मी., नंदुरबार जिल्ह्यात आज ७० मि.मी. व उद्या ३० मि.मी. पावसाची शक्यता आहे. धुळे व जळगाव जिल्ह्यांत आज व उद्या १० मि.मी. पावसाची शक्यता आहे. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून आणि ताशी वेग १० ते १५ कि.मी. राहील. कमाल तापमान सर्वच जिल्ह्यांत २७ ते २८ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८५ ते ८८ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ६५ ते ७५ टक्के राहील.

Rain Updates
Rain Update : धरणक्षेत्रात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस

मराठवाडा ः

आज उस्मानाबाद, जालना, हिंगोली, परभणी जिल्ह्यांत ४ मि.मी., लातूर व नांदेड जिल्ह्यांत ७ ते १० मि.मी., तर औरंगाबाद जिल्ह्यात ४० मि.मी. पावसाची शक्यता आहे. उद्या उस्मानाबाद, बीड व हिंगोली जिल्ह्यांत पावसात उघडीप राहणे शक्य आहे. तसेच सोमवारी लातूर, नांदेड, परभणी व जालना जिल्ह्यांत अल्पशा पावसाची शक्यता आहे. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून आणि ताशी वेग ७ ते १५ कि.मी. राहील. औरंगाबाद जिल्ह्यात कमाल तापमान २६ अंश सेल्सिअस, तर परभणी व जालना जिल्ह्यांत २९ अंश सेल्सिअस राहील. उस्मानाबाद, लातूर, नांदेड, बीड आणि हिंगोली जिल्ह्यांत कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सर्वच जिल्ह्यांत २२ ते २३ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ७७ ते ८५ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ५० ते ६० टक्के राहील.

पश्‍चिम विदर्भ ः

वाशीम जिल्ह्यात आज व उद्या ७ मि.मी. तर, बुलडाणा व अकोला जिल्ह्यांत १० ते १८ मि.मी. पावसाची शक्यता आहे. अमरावती जिल्ह्यात आज २८ मि.मी. व उद्या १४ मि.मी. पावसाची शक्यता आहे. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून आणि ताशी वेग ७ ते ११ कि.मी. राहील. कमाल तापमान सर्वच जिल्ह्यांत २९ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २२ ते २३ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८५ ते ९० टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ६५ ते ७५ टक्के राहील.

मध्य विदर्भ ः

आज व उद्या नागपूर जिल्ह्यांत ८ ते ९ मि.मी., यवतमाळ जिल्ह्यात १२ ते १३ मि.मी. व वर्धा जिल्ह्यात ९ ते १५ मि.मी. पावसाची शक्यता आहे. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग १० ते १५ कि.मी. राहील. कमाल तापमान वर्धा व नागपूर जिल्ह्यांत २८ अंश सेल्सिअस व यवतमाळ जिल्ह्यात ३० अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान २३ अंश सेल्सिअस राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ९० टक्के व दुपारची ७५ टक्के इतकी राहील.

पूर्व विदर्भ ः

चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत आज १८ ते २० मि.मी. तर उद्या १८ मि.मी. पावसाची शक्यता आहे. भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत आज ९ मि.मी. व उद्या १८ मि.मी. पावसाची शक्यता आहे. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून आणि ताशी वेग ४ ते ६ कि.मी. राहील. सर्वच जिल्ह्यांत कमाल तापमान २९ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २३ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ९२ ते ९५ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ८० टक्के राहील.

दक्षिण-पश्‍चिम महाराष्ट्र ः

आज व उद्या कोल्हापूर जिल्ह्यात ३७ व ४४ मि.मी. पावसाची शक्यता आहे. पुणे जिल्ह्यात आज १४ मि.मी. व उद्या २१ मि.मी. पावसाची शक्यता आहे. आज व उद्या सांगली, सातारा जिल्ह्यांत ७ ते ८ मि.मी. तर नगर जिल्ह्यात ३ मि.मी. आणि ६ मि.मी. पावसाची शक्यता आहे. आज व उद्या सोलापूर जिल्ह्यात पावसाची शक्यता नाही. कोल्हापूर जिल्ह्यात कमाल तापमान २८ अंश सेल्सिअस, पुणे जिल्ह्यात २९ अंश सेल्सिअस, नगर, सांगली व सातारा जिल्ह्यांत ३० अंश सेल्सिअस, तर सोलापूर जिल्ह्यात ३१ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान २२ ते २३ अंश सेल्सिअस राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८३ ते ९० टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ५० ते ७० टक्के राहील.

कृषी सल्ला ः

१) शेतात साचलेल्या पाण्याचा निचरा उताराकडील बांधाच्या एका कोपऱ्यातून करावा.

२) योग्य वाफसा येताच सोयाबीन, घेवडा, तूर, भुईमूग, बाजरी, खरीप ज्वारी या पिकांच्या पेरण्या कराव्यात.

३) आडसाली ऊस लागवडीची कामे पूर्ण करावीत.

४) जमिनीत वाफसा येताच कोळपणी करून घ्यावी.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com