Weather Update : राज्यात पावसाच्या हलक्या ते मध्यम सरींची शक्यता

मुंबई, कोकण, पुण्यासह उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम आहे. उर्वरित राज्यात पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी कोसळत आहेत.
Weather Update
Weather UpdateAgrowon

पुणे : मुंबई, कोकण, पुण्यासह उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर (Rain Intensity) कायम आहे. उर्वरित राज्यात पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी (Rainfall) कोसळत आहेत. आज (ता. १७) उत्तर कोकणात मुसळधार पावसाचा इशारा (Heavy Rain Alert) (ऑरेंज अलर्ट) आहे. उर्वरित कोकण, मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे. विदर्भात विजांसह पावसाची शक्यता (Rain Forecast) आहे.

Weather Update
Rain Update : जळगावात दहा तालुक्यांत ९० टक्क्यांवर पाऊस

मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा राजस्थानच्या बिकानेरपासून, नर्नूल, ठळक कमी दाब क्षेत्राचे केंद्र, पटना, दिघा ते आग्नेय बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे. पूर्व मध्य अरबी समुद्रापासून गुजरात, मध्य प्रदेश, ते उत्तर प्रदेशातील चक्राकार वाऱ्यांपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे.

Weather Update
Rain Forecast : मराठवाडा, विदर्भात पाऊस उघडीप देणार

कोकण, मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर पाऊस सुरूच आहे. आज (ता. १७) उत्तर कोकणातील पालघर, रायगड जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट), तर ठाणे, रत्नागिरीसह मध्य महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे. विदर्भात विजांसह पावसाचा, तसेच उर्वरित राज्यात हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

कमी दाब क्षेत्र उत्तर प्रदेशाकडे सरकले

वायव्य मध्य प्रदेशात ठळक कमी दाबाचे क्षेत्र उत्तर प्रदेशाकडे सरकले आहे. त्याला लागूनच समुद्रसपाटीपासून ४.५ किलोमीटर उंचीपर्यंत चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. ही प्रणाली ईशान्येकडे जाण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात ओडिशाच्या किनाऱ्यालगत चक्राकार वाऱ्यांची स्थिती वाहून, मंगळवारपर्यंत (ता. २०) या भागात नव्याने कमी दाब क्षेत्राची निर्मिती होण्याची शक्यता आहे.

मुसळधार पावसाचा इशारा. (ऑरेंज अलर्ट) :

पालघर, रायगड.

जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

ठाणे, रत्नागिरी, पुणे.

विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

बुलडाणा, अकोला, वाशीम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com