Rain : परभणी, हिंगोली जिल्ह्यांत हलका ते मध्यम पाऊस

गेल्या दोन दिवसांपासून पावसाची भुरभुर सुरू असल्यामुळे आंतरमशागत, फवारणीच्या कामाचा खोळंबा झाला आहे.
Rain Update
Rain UpdateAgrowon

परभणी ः परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील ८२ मंडलांत मंगळवारी (ता. १६) सकाळी आठ पर्यंतच्या २४ तासांत हलका ते मध्यम पाऊस (Rainfall) झाला. गेल्या दोन दिवसांपासून पावसाची भुरभुर सुरू असल्यामुळे आंतरमशागत (Inter Cultivation), फवारणीच्या (Spraying) कामाचा खोळंबा झाला आहे.

Rain Update
Cotton : जगभरातील कापूस पीक नैसर्गिक आपत्तीने संकटात

परभणी जिल्ह्यातील ५२ मंडलांत हलका ते मध्यम पाऊस झाला. गेल्या २४ तासांत सरासरी ४.१ मिलिमीटर, ऑगस्ट महिन्यात सरासरी ५४.२ मिलिमीटर, तर १ जूनपासून आजवर एकूण सरासरी ५०४.४ मिलिमीटर पाऊस झाला. हिंगोली जिल्ह्यातील ३० मंडलांत हलका ते मध्यम पाऊस झाला. गेल्या २४ तासांत सरासरी ६.८ मिलिमीटर, ऑगस्ट महिन्यात सरासरी ११०.४, तर १ जून पासून एकूण सरासरी ७१३.४ मिलिमीटर पाऊस झाला.

Rain Update
Fertilizer Import : खत आयातीवरील अवलंबित्व कायम

मंडलनिहाय पाऊस (५ मिलिमीटरच्या पुढे) परभणी जिल्हा ः झरी ८, जिंतूर ८.३, सावंगी म्हाळसा ५.३, बामणी ६.५, बोरी ८.५, आडगाव ६.५, चारठाणा ६, वाघी धानोरा ६, दूधगाव ८, सेलू ८.३, वालूर १३.८, कुपटा ६, चिकलठाणा ७.८, मोरेगाव ७.३.

हिंगोली जिल्हा ः हिंगोली ८.५, नरसी नामदेव ८.५, सिरसम १०.५, बासंबा ८.३, डिग्रस कऱ्हाळे ६.८, माळहिवरा ८.८, खंबाला ७.३, कळमनुरी ५.५, वाकोडी ९.८, डोंगरकडा ५.३, आंबा ५.५, टेंभुर्णी ६.८, औंढानागनाथ ६.५, येळेगाव ६.८, साळणा ६.५, जवळा बाजार ५.५, सेनगाव ७.३, गोरेगाव १०.५, आजेगाव ७.८, साखरा ७.५, पानकन्हेरगाव ८, हत्ता ८.५.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com