Rain Update : पुणे जिल्ह्यात हलका ते मध्यम पाऊस

पुणे जिल्ह्यात बहुतांश भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे. काही ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे.
Rain Update
Rain UpdateAgrowon

पुणे : पावसासाठी गेल्या दोन ते तीन दिवसांपूर्वी पोषक वातावरण (Favorable Climate Condition For Rain) तयार झाल्याने अनेक ठिकाणी पाऊस पडत आहे. पुणे जिल्ह्यात बहुतांश भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस (Rainfall In Pune) पडत आहे. काही ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे. वेल्ह्यात सर्वाधिक २३७ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली. त्यामुळे काही धरणातील पाणीपातळीत (Water Level In Dam) वाढ झाली आहे. वीर, भामा आसखेड दोन धरणांतून पाण्याचा विसर्ग मंगळवारी (ता.९) सोडण्यात आला आहे.

Rain Update
Tur Sowing : खानदेशात तूर लागवड स्थिर

जिल्ह्यातील अनेक भागात पावसाने जोर धरला आहे. त्यामुळे पिकांना चांगलाच दिलासा मिळाला आहे. अनेक ठिकाणी पिके वाढीच्या अवस्थेत आहेत. पश्चिम पट्ट्यात भात लागवडी झाल्या असून अंतिम टप्प्यात आल्या आहेत. भातासाठी हा पाऊस पोषक असल्याने भात पिके चांगलीच तरारली आहेत. पूर्व भागात पावसाचा जोर कमी आहे. तरीही मागील दहा ते पंधरा दिवस पावसाने घेतलेल्या उसंतीमुळे पिके वाफसा स्थितीत आली होती. त्यातच काही ठिकाणी पिकांना पावसाची गरज भासू लागली होती. परंतु वेळेवर पाऊस सुरू झाल्याने पिकांना चांगलाच आधार मिळाला आहे.

Rain Update
पिकाला विद्राव्य खते कशी द्याल?

हवेलीतील बहुतांश भागात कमी-अधिक पाऊस पडला आहे. तर थेऊर, उरुळी कांचन, भोसरी, कळस, हडपसर, वाघोली भागांत पावसाच्या तुरळक सरी बरसल्या. मुळशी, भोर, मावळ, वेल्हा तालुक्यांत पावसाने जोरदार सरी कोसळल्या. तर जुन्नर, आंबेगाव, खेड भागांत मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. खेडमधील आळंदी, पिंपळगाव, आंबेगामधील मंचर भागांतही पावसाच्या हलक्या सरी पडल्या. शिरूरमधील टाकळी, वडगाव, न्हावरा, मलठण, तळेगाव, रांजणगाव, कोरेगाव, पाबळ, शिरूर बारामतीतील बारामती, माळेगाव, पणदरे, वडगाव, लोणी, सुपा, मोरगाव, उंडवडी इंदापुरातील भिगवण, इंदापूर, लोणी, बावडा, काटी, निमगाव, अंथुर्णी, सणसर भागांत पावसाच्या तुरळक सरी पडल्या.

दौंडमधील पाटस येथे १० मिलिमीटर, तर देऊळगाव, यवत, कडेगाव, राहू, वरवंड, रावणगाव, दौंड. पुरंदरमधील कुंभारवळण येथे १४ मिलिमीटर, तर सासवड, भिवंडी, जेजुरी, परिंचे, राजेवाडी, वाल्हा येथे पावसाच्या हलक्या सरी बरसल्या.

मंगळवारी (ता.९) सकाळी आठ वाजेपर्यंत मंडळनिहाय झालेला पाऊस (मिलिमीटरमध्ये)

हवेली - पुणे वेधशाळा १४, केशवनगर १४, कोथरूड २५, खडकवासला १४, खेड १४, चिंचवड १२,

मुळशी - पौड ४६, घोटावडे ३६, थेरगाव २२, मुठे १०४, पिरंगूट २८

भोर - भोर २७, भोलावडे ५०, नसरापूर ४०, किकवी १३, वेळू १८, आंबवडे ३२, संगमनेर ६४, निगुडघर ७७

मावळ - वडगाव मावळ ५९, तळेगाव ३०, काले ४७, कार्ला ६०, खडकाळा ३०, लोणावळा ७३, शिवणे ३०

वेल्हा - पानशेत ५४, विंझर ४४, आंबवणे ४०

जुन्नर - जुन्नर १७, नारायणगाव ११, वडगाव आनंद १५, निमगाव सावा १५, बेल्हा १७, राजूर २६, डिंगोरे १३, ओतूर २१

खेड - वाडा ४५, राजगुरुनगर १२, कुडे ३९, पाईट १२, चाकण १७, कन्हेरसर १६, कडूस १२

आंबेगाव - घोडेगाव १५, आंबेगाव २२, कळंब १२, पारगाव २५,

वीर, भामा आसखेडमधून पाण्याचा विसर्ग :

जोरदार झालेल्या पावसामुळे वीर धरणाच्या उजवा कालवा विद्युतगृहातून ८०० क्युसेक व डावा कालवा विद्युतगृहातून ३०० क्युसेक विसर्ग नदीपात्रात सुरू आहे. वीर धरणाच्या सांडव्यातून मंगळवारी (ता.९) सकाळी ९ वाजता ४६३७ क्युसेक इतका विसर्ग सुरू करण्यात आला आहे. सध्या नीरा नदीपात्रात एकूण ५७३७ क्युसेक विसर्ग सुरू आहे. तसेच भामा आसखेड धरण जलाशय पातळी सकाळी १० वाजता ६७०.९० मी आणि एकूण पाणीसाठा २२१.५१३ दलघमी ९५.७९ टक्के झाला आहे. भामा आसखेड प्रकल्पात पाण्याचा येवा सुरू आहे. पाणलोट क्षेत्रातील पाण्याचा येवा बघता धरण कधीही ९८ टक्के भरू शकते. त्यानंतर पाणलोट क्षेत्रातील पाऊस व पाण्याचा येवा यानुसार सांडव्यावरून भामा नदीत

विसर्ग सोडण्यात येणार आहे. याशिवाय गुंजवणी धरणातही पाण्याची पातळी वाढत असल्याने विद्युतगृहातून २०० क्युसेकने विसर्ग करण्यात येणार आहे. नागरिकांनी नदीपात्रात उतरू नये. पावसाच्या प्रमाणानुसार विसर्गामध्ये बदल होऊ शकतो याची नोंद घेण्यात यावी. नदीकाठच्या नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com