Rain Update
Rain Update Agrowon

Rain Update : धरणक्षेत्रात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस

गेल्या चार ते पाच दिवसांपासून पावसाचा प्रभाव कमी झाला आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे.

पुणे : गेल्या चार ते पाच दिवसांपासून पावसाचा (Rain) प्रभाव कमी झाला आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस (Light Rainfall in Dam Area) पडत आहे. बुधवारी (ता.२०) सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये पवना धरणांच्या पाणलोट क्षेत्रात (Pawana Dam Catchment Area) ३४ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद जलसंपदा विभागाकडे (Department Of Water Resources) झाली आहे.

Rain Update
Crop Damage : संततधार पाऊस, पुरामुळे ३३ हजार हेक्टरला फटका

यंदा पावसाळ्यात चांगल्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला होता. त्यानुसार जून महिन्यात उशिराने मॉन्सून दाखल होत कमी पाऊस पडला. परंतु जूनच्या अखेरीस पावसासाठी पोषक वातावरण तयार झाल्यामुळे मुसळधार पाऊस पडला. विशेषतः धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर अधिक होता. त्यामुळे तळ गाठलेल्या धरणांत पुन्हा पाण्याची आवक सुरू होण्यास सुरुवात झाली. जुलैच्या पहिल्या चार ते पाच दिवस आवक कमी असली तरी दुसऱ्या आठवड्यात घाटमाथ्यावर व पाणलोट क्षेत्रात झालेल्या अति मुसळधार पावसामुळे आवकेत चांगलीच वाढ झाली. त्यामुळे बुधवारीही चोवीस तासांमध्ये जिल्ह्यातील २६ धरणांत ६.५७ टीएमसी एवढी पाण्याची आवक झाली होती. त्यामुळे जिल्ह्यातील धरणसाठा हा १३०.४१ टीएमसीपर्यंत पोहोचला होता. मृतसाठा गृहीत धरून धरणांत १४४.६१ टीएमसी एवढा पाणीसाठा झाला आहे.

Rain Update
पुणे जिल्ह्यात हलका पाऊस

पवना धरणांपाठोपाठ टेमघर धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही ३३ मिलिमीटर पाऊस पडला. वडिवळे धरणांच्या पाणलोट क्षेत्रात ३० मिलिमीटर, कळमोडी २९, नीरा देवघर २७, चिल्हेवाडी २२, पिंपळगाव जोगे २१, वरसगाव १६, पानशेत १५, वडज १३, डिंभे १२, गुंजवणी, माणिकडोह १० मिलिमीटर पाऊस पडला. येडगाव, भाटघर, आंध्रा, भामा आसखेड, चासकमान, खडकवासला या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात तुरळक सरी बरसल्या.

कासारसाई, शेटफळ, नाझरे, वीर, घोड, विसापूर, उजनी या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात ढगाळ वातावरणाची स्थिती कायम होती. पावसाचा जोर कमी झाल्याने धरणातील पाण्याच्या विसर्गातही घट करण्यात आली आहे. सध्या खडकवासला, कासारसाई, कळमोडी, चासकमान, आंध्रा, वडिवळे, गुंजवणी, वीर, येडगाव, वडज, चिल्हेवाडी, घोड या धरणांतून कानंदी, कुकडी, मीना, घोड, इंद्रायणी, भीमा, आरळा, पवना या नद्यांना पाण्याचा काही प्रमाणात विसर्ग सुरू आहे.

एक जून ते २० जुलैपर्यंत झालेला धरणाच्या पाणलोट क्षेत्रनिहाय पाऊस (मिलिमीटरमध्ये)

टेमघर १६७६, वरसगाव १३५८, पानशेत १३९८, खडकवासला ३५७, पवना १४६१, कासारसाई ५७१, कळमोडी १०१४, चासकमान ५५४, भामा आसखेड ५६८, आंध्रा ७३०, वडिवळे ८०५, नाझरे ११५, गुंजवणी १२७३, भाटघर ४८३, नीरा देवघर ११२९, वीर १६०, पिंपळगाव जोगे ६९६, माणिकडोह ८२६, येडगाव ५०१, वडज ४३४, डिंभे ३९६, घोड २७३, विसापूर १००, उजनी २३८,

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com