Rain Update : हलक्‍या ते मध्यम स्वरूपात पावसाची शक्‍यता

पश्‍चिम महाराष्ट्रातील सांगली व कोल्हापूर या जिल्ह्यांतही सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. मात्र उस्मानाबाद, लातूर, नांदेड या मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये आणि वर्धा या विदर्भातील जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याचे स्पष्ट होते.
Rain Update
Rain UpdateAgrowon

महाराष्ट्रावरील उत्तरेकडे १००२ हेप्टापास्कल, तर दक्षिणेकडे १००४ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब (Air Pressure) मंगळवार (ता. १६) पर्यंत राहील. त्यानंतर बुधवारी (ता. १७) व त्यापुढे महाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागावर १००४ हेप्टापास्कल व दक्षिणेकडील भागावर १००६ हेप्टापास्कल इतका अधिक हवेचा दाब राहील. त्यामुळेच रविवार ते मंगळवार या कालावधीत कोकणात मध्य स्वरूपात, उत्तर महाराष्ट्रात (North Maharashtra) हलक्‍या ते मध्यम स्वरूपात, मराठवाड्यात हलक्‍या स्वरूपात, पश्‍चिम, मध्य व पूर्व विदर्भात हलक्‍या ते मध्यम स्वरूपात नैर्ऋत्य महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यात मध्यम स्वरूपात व सांगली, सातारा, सोलापूर, पुणे व नगर जिल्ह्यांत हलक्‍या स्वरूपात पावसाची शक्‍यता (Rain Forecast) आहे. मराठवाडा व विदर्भात वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहिल्यामुळे पावसाचे प्रमाण कमी राहील. १ जून ते ३ ऑगस्ट या २ महिन्यांच्या कालावधीमधील राज्यातील पावसाचे वितरण लक्षात घेता रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या कोकणातील जिल्ह्यांत सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याचे स्पष्ट होते. तसेच पश्‍चिम महाराष्ट्रातील सांगली व कोल्हापूर या जिल्ह्यांतही सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. मात्र उस्मानाबाद, लातूर, नांदेड या मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये आणि वर्धा या विदर्भातील जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस (Rainfall) झाल्याचे स्पष्ट होते.

Rain Update
Ujani Dam : उजनी धरणाची पाणी पातळी ७० टक्क्यांकडे

१) कोकण ः

सिंधुदुर्ग जिल्ह्यात रविवारी व सोमवारी प्रत्येकी ५३ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे; तर रत्नागिरी जिल्ह्यात रविवारी ६४ मि.मी. व सोमवारी ६० मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. त्यानंतर महाराष्ट्रावरील हवेच्या दाबात वाढ होत असून पावसाचे वितरण कमी होईल. रायगड जिल्ह्यात रविवारी ६० मि.मी. व सोमवारी ५० मि.मी. तसेच ठाणे व पालघर जिल्ह्यात रविवारी ४५ मि.मी. व सोमवारी ४८ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग ११ ते १५ कि.मी. राहील. सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत कमाल तापमान २९ अंश सेल्सिअस राहील; तर रायगड, ठाणे व पालघर जिल्ह्यांत ते ३० अंश सेल्सिअस राहील. सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत किमान तापमान २५ अंश सेल्सिअस राहील; तर रायगड, ठाणे व पालघर जिल्ह्यांत ते २६ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ९० टक्के, तर दुपारची ८० टक्के राहील.

२) उत्तर महाराष्ट्र ः

नाशिक जिल्ह्यात रविवारी ३० मि.मी., तर सोमवारी ३३ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. त्यानंतर पावसाचे प्रमाण कमी होईल. धुळे व नंदूरबार जिल्ह्यात प्रत्येकी रविवारी व सोमवारी १६ मि.मी. व जळगाव जिल्ह्यात १२ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग १६ ते १८ कि.मी. राहील. कमाल तापमान सर्वच जिल्ह्यांत ३१ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २३ ते २४ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८५ ते ९० टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ६५ ते ७५ टक्के राहील.

Rain Update
Rain : मध्य प्रदेश, गुजरातेत नद्यांची पातळी वाढली

३) मराठवाडा ः

उस्मानाबाद जिल्ह्यात पावसात उघडीप राहू शकते. लातूर, बीड जिल्ह्यांत रविवारी व सोमवारी ४ ते ५ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. जालना व हिंगोली जिल्ह्यांत प्रति दिन रविवारी व सोमवारी १० ते २५ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. औरंगाबाद जिल्ह्यात रविवारी २० मि.मी. व सोमवारी ७ मि.मी. तसेच नांदेड जिल्ह्यात रविवारी २५ मि.मी. व सोमवारी ३४ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. बुधवारनंतर पावसाचे प्रमाण कमी होईल. वाऱ्याची दिशा प्रामुख्याने वायव्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग १७ ते २० कि.मी. राहील. कमाल तापमान उस्मानाबाद, लातूर, बीड या जिल्ह्यांत ३१ अंश सेल्सिअस राहील; तर नांदेड, परभणी, हिंगोली, जालना व औरंगाबाद जिल्ह्यांत ३२ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान उस्मानाबाद, लातूर, बीड व जालना जिल्ह्यांत २३ अंश सेल्सिअस राहील; तर नांदेड, परभणी, हिंगोली व औरंगाबाद जिल्ह्यांत २४ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ७२ ते ८६ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ६० ते ६४ टक्के राहील.

४) पश्‍चिम विदर्भ ः

बुलडाणा, अकोला, वाशीम व अमरावती जिल्ह्यांत रविवारी १३ ते १८ मि.मी. व सोमवारी १८ ते २६ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. त्यानंतर पावसाचे प्रमाण कमी होईल. वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग १९ ते २१ कि.मी. राहील. कमाल तापमान बुलडाणा व अमरावती जिल्ह्यात ३१ अंश सेल्सिअस राहील; तर अकोला व वाशीम जिल्ह्यांत ३२ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सर्वच जिल्ह्यांत २३ ते २४ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८७ ते ९० टक्के राहील; तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ६८ ते ७० टक्के राहील.

५) मध्य विदर्भ ः

यवतमाळ, वर्धा व नागपूर जिल्ह्यांत रविवारी १८ ते २५ मि.मी., तर सोमवारी ३२ ते ४२ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा प्रामुख्याने वायव्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग २० ते २१ कि.मी. राहील. कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअस राहील; तर किमान तापमान २३ ते २४ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८७ ते ८८ टक्के राहील; तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ६६ ते ७० टक्के राहील.

६) पूर्व विदर्भ ः

रविवारी गडचिरोली, भंडारा, चंद्रपूर व गोंदिया जिल्ह्यांत २४ ते २५ मि.मी. पावसाची, तर सोमवारी चंद्रपूर व भंडारा जिल्ह्यांत ३५ मि.मी. आणि गडचिरोली व गोंदिया जिल्ह्यांत ६० मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. त्यानंतर पावसाचे प्रमाण कमी होईल. वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग १२ ते १९ कि.मी. राहील. कमाल तापमान सर्वच जिल्ह्यांत ३२ अंश सेल्सिअस राहील; तर किमान तापमान भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत २३ अंश सेल्सिअस व चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत २४ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ९० टक्के, तर दुपारची ७० टक्के राहील.

७) नैर्ऋत्य महाराष्ट्र ः

कोल्हापूर जिल्ह्यात रविवारी व सोमवारी ४५ ते ४८ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. सांगली, सातारा व पुणे जिल्ह्यांत रविवारी १० ते २० मि.मी. आणि नगर व सोलापूर जिल्ह्यांत ३ ते ५ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. सोमवारी सांगली, सातारा, पुणे, नगर, सोलापूर या जिल्ह्यांत ५ ते १० मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग १२ ते २० कि.मी. राहील. कमाल तापमान सातारा व कोल्हापूर जिल्ह्यांत २९ अंश सेल्सिअस राहील. सांगली जिल्ह्यात ते ३० अंश सेल्सिअस राहील. सोलापूर, पुणे व नगर जिल्ह्यात ३१ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान २३ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८० ते ९० टक्के राहील व दुपारची आर्द्रता ६६ ते ८३ टक्के राहील.

कृषी सल्ला ः

१) भात खाचरात पाण्याची पातळी भातरोपांच्या उंचीनुसार २ सें.मी. ठेवावी.

२) भुईमूग, मूग, उडीद, मका, बाजरी, घेवडा, तूर, सोयाबीन या पिकांमध्ये पाणी साचले असल्यास उताराकडील बांधाच्या कोपऱ्यातून पाणी काढून द्यावे.

३) जनावरांना रोगप्रतिबंधक लसीकरण करावे.

४) कुक्कुटपालन पक्ष्यांना रोगप्रतिबंधक लस टोचावी.

५) नवीन लागवड केलेल्या फळपिकांच्या रोपांना काठीचा आधार द्यावा.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com