शंभर बड्या थकबाकीदारांची यादी जिल्हा बँकेकडून जाहीर

माजी संचालकच पहिल्या स्थानावर; वसुलीसाठी बँक ॲक्शन मोडवर
List of 100 big defaulters released by district bank
List of 100 big defaulters released by district bank Agrowon

ॲग्रोवन वृत्तसेवा

नाशिक : जिल्हा बँक (District Bank) आर्थिक अडचणीत सापडली असल्याने प्रशासक अरुण कदम यांनी सध्या बड्या थकबाकीदारांवर सक्तीने कारवाईचा निर्णय घेतला आहे. त्यांनी शनिवारी (ता. १७) शंभर मोठ्या थकबाकीदारांची यादी जाहीर केली. या थकबाकीदारांमध्ये बँकेचे माजी संचालक, आमदार, माजी जिल्हा परिषद सदस्य यांच्या कुटुंबातील सदस्यांचा समावेश आहे. तर माजी संचालक गणपत पाटील यांच्याकडे ६ कोटी ५३ लाख इतकी थकबाकी आहे. प्रत्येक गावात ही यादी लावल्याने या शंभर जणांसह इतर थकबाकीदारांचे धाबे दणाणले आहे.

List of 100 big defaulters released by district bank
Weather Update : पूर्व विदर्भात पाऊस वाढणार

नाशिक जिल्हा बँकेचा २०२२-२३ चा कर्जवसुली हंगाम लवकरच सुरू होत असल्याने बँकेची शेती कर्जाची एकूण १,९१० कोटींची रक्कम वसुलीस पात्र आहे. त्यापैकी रक्कम १,३७० कोटींची जुनी थकबाकी आहे. चालू वसुली हंगामात जास्तीत जास्त थकीत कर्जवसुली होण्यासाठी व बँकेच्या खातेदारांना ठेवींची, खात्यावरील त्यांची बचतीची रक्कम उपलब्ध होण्यासाठी जिल्ह्यातील मोठे व प्रभावशाली, तसेच हेतुपुरस्सर कर्ज परतफेड न करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत.

थकबाकीदारांचे महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १५६ व महाराष्ट्र सहकारी संस्थांचे नियम १९६१ च्या नियम १०१ नुसार कारवाई करून मोठे व प्रभावशाली असलेले, तसेच हेतुपुरस्सर कर्ज परतफेड न करणारे थकबाकीदारांवर थकबाकी, कर्ज वसुलीसाठी कारवाईचे आदेशात म्हटले आहे. त्यानुसार बँकेने जिल्ह्यातील व तालुक्यातील ऐपतदार व प्रभावशाली असलेले, तसेच हेतुपुरस्सर कर्ज परतफेड न करणारे वारंवार थकीत कर्ज भरण्यासाठी नोटिसा देऊनही व वारंवार सौजन्याने संपर्क करूनही थकीत कर्ज रकमेचा बँकेकडे भरणा केला नाही, अशा थकबाकीदार सभासदांच्या तालुकानिहाय याद्या तयार करून त्यांची नावे जाहीर केली आहेत. या थकबाकीदारांची यादी जाहीर झाली असून, लवकरच बँक ॲक्शन मोडमध्ये येणार आहे. थकबाकीदारांनी कायदेशीर कारवाई टाळून थकवाकीचा भरणा लवकरात लवकर करून बँकेस सहकार्याचे आवाहन बँकेचे प्रशासक अरुण कदम व मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश पिंगळे यांनी केले आहे.

List of 100 big defaulters released by district bank
Soybean Oil Import : सोयाबीन तेल आयात आठ टक्क्यांनी वाढली

वसुलीसाठी कडक पावले

मार्च २०२३ अखेर जास्तीत जास्त कर्जवसुली होण्यासाठी कर्जवसुली मोहीम राबवून व या मोठ्या थकबाकीदारांच्या मालमत्तांची जप्ती करत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत जवळपास ६०० ते ७०० थकबाकीदारांची स्थावर जप्ती करून ते लिलाव करण्यात येणार आहे. बँकेच्या प्रशासकांनी बँकेची सूत्रे हाती घेतल्यानंतर ट्रॅक्टर, जीप यांसारख्या जवळपास ३५० वाहनांची जप्ती केली आहे. या वाहनांच्या लिलावातून सहा कोटी रकमेची वसुली झाली आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com