Farmer Incentive Scheme : प्रोत्साहनपर योजनेच्या ६५ हजार ३६४ लाभार्थ्यांची यादी प्रसिद्ध

महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजना शासनाकडून जाहीर करण्यात आली
Farmer Incentive Subsidy
Farmer Incentive SubsidyAgrowon

यवतमाळ : महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना (Farmer Loan Waive Scheme) २०१९ अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजना (Farmer Incentive Subsidy) शासनाकडून जाहीर करण्यात आली असून या योजनेच्या ६५ हजार ३६४ लाभार्थ्यांची विशिष्ट क्रमांकाची प्रथम यादी पोर्टलवर प्रसिद्ध केली आहे.

Farmer Incentive Subsidy
Farmer Loan : शेतकऱ्यांवर कर्जफेडीच्या ओझ्याखाली दबण्याची वेळ

योजनेच्या निकषानुसार पात्र लाभार्थ्यांची पहिली यादी जाहीर करण्यात आली असून यात ६५ हजार ३६४ लाभार्थ्यांचा समावेश आहे. पोर्टलव्दारे प्राप्त झालेल्या यादया संबंधित ग्रामपंचायत कार्यालय, विविध कार्यकारी सहकारी संस्था कार्यालय,संबंधित बॅंक शाखा, तहसीलदार कार्यालय, सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था कार्यालय या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात येणार आहेत.

Farmer Incentive Subsidy
Crop Damage : ओला दुष्काळ जाहीर करा

पात्र लाभार्थ्यांच्या यादीमध्ये समाविष्ट असणाऱ्या लाभार्थ्यांनी जवळच्या आपले सरकार सेवा केंद्र येथे भेट देऊन आपल्या विशिष्ट क्रमांकाच्या अनुषंगाने आपल्या कर्ज खात्याच्या आधार प्रमाणिकरणाची प्रक्रिया पूर्ण करावी. आधार कार्ड, विशिष्ठ क्रमांक, बॅंक पास बुक इत्यादी कागदपत्रे सोबत ठेवावीत. लाभार्थ्यांना अडचणी येत असल्यास त्याबाबत ऑनलाइन तक्रार प्रणालीद्वारे पोर्टलवर आपली तक्रार दाखल करता येणार आहेत.

तक्रारी ऑनलाइन पद्धतीने निकाली काढणार

जिल्हास्तरीय आणि तालुकास्तरीय समितीकडे दाखल केलेल्या तक्रारींच्या अनुषंगाने तक्रारदारांनी आवश्यक कागदपत्रांची पुर्तता केल्यानंतर त्यांच्या तक्रारी ऑनलाइन पद्धतीने निकाली काढण्यात येतील. जिल्हास्तरीय आणि तालुकास्तरीय समितीकडे दाखल केलेल्या तक्रारींच्या अनुषंगाने तक्रारदारांनी आवश्यक कागदपत्रांची पुर्तता केल्यानंतर त्यांच्या तक्रारी ऑनलाइन पद्धतीने निकाली काढण्यात येतील. बँकांनी अपलोड केलेल्या माहितीप्रमाणे योजनेच्या निकषानुसार पात्र सर्व लाभार्थ्यांच्या याद्या नजीकच्या काळात प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे कळविण्यात आले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com