Lumpy Skin: लम्पी स्कीन रोखण्यासाठी जनावरांचे बाजार बंदः विखे पाटील

सद्यस्थितीत राज्यातील १७ जिल्ह्यांमध्ये लम्पी स्कीन आजाराचा प्रादुर्भाव झाला आहे. राज्यात लम्पी आजाराने ३२ तर जळगाव जिल्ह्यात १२ जनावरांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती विखे पाटील यांनी दिली.
Lumpy Skin Disease
Lumpy Skin DiseaseAgrowon

राज्यात लम्पी स्कीन (Lumpy skin disease) आजाराचा प्रसार रोखण्यासाठी जनावरांचे बाजार बंद करण्यात आले आहेत. राज्याचे पशुसंवर्धन व महसुलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Minister Radhakrishna Vikhe Patil) यांनी ही माहिती दिली. आंतरराज्यीय, आंतर जिल्हा, आंतर तालुकास्तरावर जनावरांची ने आण बंद करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

Lumpy Skin Disease
Lumpy Skin Disease : ‘लम्पी स्कीन’ प्रादुर्भावामुळे कोट्यवधी रुपयांचा फटका

सद्यस्थितीत राज्यातील १७ जिल्ह्यांमध्ये लम्पी स्कीन आजाराचा प्रादुर्भाव झाला आहे. राज्यात लम्पी आजाराने ३२ तर जळगाव जिल्ह्यात १२ जनावरांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती विखे पाटील यांनी दिली. जळगाव जिल्ह्यात त्यांनी नुकतीच आढावा बैठक घेतली. सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कार्यालयात बसून न राहता थेट शेतकऱ्यांच्या दारात जावे आणि औषधोपचार व इतर मदत करावी, अशी कानउघडणी त्यांनी यावेळी केली.

Lumpy Skin Disease
Lumpy Skin : ‘लम्पी स्कीन’ नियंत्रणासाठी मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करा

राज्यात लम्पी स्कीन या आजाराचा शिरकाव हा गुजरात आणि राजस्थान या राज्यातून झाला आहे. या आजारात मृत्यूचे प्रमाण अत्यल्प असले तरी लसीकरण करण्यास प्राधान्य दिले जात आहे, असे विखे पाटील म्हणाले.

जनावरांमध्ये लम्पी स्कीन डीसीजची (Lumpy skin diseases) लक्षणे आढळून येताच जनावरांना शासकीय पशुचिकित्सालयात (Government Veterinary Hospital) आणावे. जिल्हा परिषदेच्या (Zilla Parishad) माध्यमातून पशु चिकित्सालयात आवश्यक पशु औषधे उपलब्ध करून देण्यात येतील, असे विखे पाटील यांनी सांगितले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com