Lumpy Skin : जनावरांचे बाजार बंद राहणार

लम्पी स्कीनबाबत नांदेड जिल्हा नियंत्रित क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. गोजातीय प्रजातीची सर्व गुरे व म्हशी यांची ज्या ठिकाणी ते पाळले (ठेवले) जातात त्या ठिकाणापासून नियंत्रित किंवा त्या क्षेत्राबाहेरील अन्य कोणत्याही ठिकाणी ने-आण करण्यास मनाई करण्यात आली आहे.
Animal Care
Animal CareAgrowon

नांदेड : जिल्ह्यात लम्पी स्कीन आजारांवर (Lumpy Skin Outbreak) नियंत्रण, प्रतिबंध, निर्मूलन करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सर्व गुरे व म्हशी यांची ने-आण करणे, बाजार भरविणे, (Livestock Market Closed) प्राण्यांच्या शर्यती, जत्रा भरविणे, प्रदर्शन भरविणे तसेच प्राण्यांना एकत्र आणून कार्यक्रम करण्यास प्रतिबंध घालण्याचे आदेश जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनी दिले आहेत.

Animal Care
Lumpy Skin : दहा तालुक्यांत ‘लम्पी स्कीन’चा प्रादुर्भाव

लम्पी स्कीनबाबत नांदेड जिल्हा नियंत्रित क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. गोजातीय प्रजातीची सर्व गुरे व म्हशी यांची ज्या ठिकाणी ते पाळले (ठेवले) जातात त्या ठिकाणापासून नियंत्रित किंवा त्या क्षेत्राबाहेरील अन्य कोणत्याही ठिकाणी ने-आण करण्यास मनाई करण्यात आली आहे. गोजातीय प्रजातीची बाधित असलेली कोणतीही जिवंत किंवा मृत गुरे व म्हशी, गोजातीय प्रजातींची कोणत्याही बाधित झालेल्या प्राण्यांच्या संपर्कात आलेली कोणत्याही प्रकारची वैरण, प्राण्यांच्या निवाऱ्यासाठी असलेली गवत किंवा अन्य साहित्य आणि अशा प्राण्यांच्या शव, कातडी किंवा अन्य कोणताही भाग किंवा अशा प्राण्यांचे उत्पादन किंवा असे प्राणी नियमित क्षेत्राच्या बाहेर नेण्यासाठी कोणत्याही व्यक्तीस मनाई करत आहे.

पुढील आदेशापर्यंत बाजार बंद

जनावरांच्या खरेदी विक्रीसाठीचे जिल्ह्यातील सर्व बाजार पुढील आदेश होईपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत. लम्पी स्कीन आजाराबाबत संशयित असलेल्या किंवा संक्रमित झालेल्या प्राण्यांच्या प्रवेशास प्रतिबंध करण्याच्या दृष्टीने जिल्ह्यात असंक्रमित क्षेत्रामध्ये अनुसूचित रोगाच्या प्रसार होण्यास प्रतिबंध करण्यासाठी सीमा तपासणी नाक्यावर काटेकोर अंमलबजावणी व कार्यवाही करण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनी कळविले आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com