MSEB Load shading : धानपट्ट्यातील १६ तासांचे भारनियमन मागे घेण्यात यावे

धान पिकाचा हंगाम अंतिम टप्प्यात असताना दिवसाला १६ तासांचे भारनियमन केले जात आहे. हा प्रकार अन्यायकारक असून, हे भारनियमन मागे घेण्यात यावे
MSEB Load shading : धानपट्ट्यातील १६ तासांचे भारनियमन मागे घेण्यात यावे

चंद्रपूर : धान पिकाचा हंगाम (Crop Season) अंतिम टप्प्यात असताना दिवसाला १६ तासांचे भारनियमन केले जात आहे. हा प्रकार अन्यायकारक असून, हे भारनियमन ()Electricity Load Shading) मागे घेण्यात यावे, अशी मागणी आमदार डॉ. देवराव होळी (Dr. Devrao Holi) यांनी उपमुख्यमंत्री तसेच अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Phadnvis) यांच्याकडे केली आहे.

MSEB Load shading : धानपट्ट्यातील १६ तासांचे भारनियमन मागे घेण्यात यावे
Crop Damage : काढणीला आलेले पीक मिसळले मातीत

वीज भारनियमनामुळे पीक व्यवस्थापनात येणाऱ्या अडचणीचे निवेदन भेंडाळा उपकेंद्र परिसरातील शेतकऱ्यांनी आमदार होळी यांची भेट घेत दिले होते. भारनियमनाची समस्या दूर करण्याची मागणी याद्वारे करण्यात आली होती.

MSEB Load shading : धानपट्ट्यातील १६ तासांचे भारनियमन मागे घेण्यात यावे
Crop Insurance : फळपीक विमा योजनेत सहभागी होण्याचे शेतकऱ्यांना आवाहन

या वेळी दिलीप चलाख, साईनाथ बुरांडे, भोजराज भगत, भुवनेश्‍वर चुधरी, संजय खेडेकर, संजय चौधरी, सुभाष चुनारकर, अजित भोयर, नाजूक पोरटे, रवी आभारे, वासुदेव कोहपरे, देवाजी भोयर यांची उपस्थिती होती. शेतकऱ्यांनी या वेळी वीज कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून मिळणाऱ्या असहकार्याबद्दलही अनेक तक्रारी केल्या.

भेंडाळा उपकेंद्र अंतर्गंत गावांमध्ये असलेली पाणीपुरवठा योजनाही प्रभावित झाली आहे. सिंचनाचे पाणी टेलवरील शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे त्यांना कृषिपंपाच्या आधारे त्यांच्या शेतातील स्रोतांच्यामाध्यमातून पाणी उपसा करण्याशिवाय कोणताच पर्याय राहत नाही.

महाविकास आघाडी सरकारच्या काळापासून १६ तास वीज भारनियमन केले जात आहे. त्यामुळे पाणी असताना त्याचा उपसा करणे शक्‍य होत नाही. किमान धानाची काढणी होईपर्यंत भारनियमन शिथिल करावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. भेंडाळा परिसरातील २२ गावचे नागरिक या वेळी उपस्थित होते. शेतकऱ्यांच्या या मागण्यांची दखल घेत आमदार होळी यांनी ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com