Jalgaon DCC Bank : कर्जासाठीसाठी शेतकऱ्यांना लागणारी प्रोसेसींग फी रद्द

जिल्हा बँकेतून मिळणाऱ्या कर्जासाठी शेतकऱ्यांना लागणारी प्रोसेसिंग फि आता रद्द करण्यात आली आहे.
Jalgaon DCC Bank
Jalgaon DCC BankAgrowon

Jalgaon DCC Bank : जिल्हा बँकेतून मिळणाऱ्या कर्जासाठी (Loan) शेतकऱ्यांना लागणारी प्रोसेसिंग फि (Processing Fee For Loan) आता रद्द करण्यात आली आहे. एटीएमची मुदत संपल्यामुळे सद्यस्थितीत कर्जाची रक्कम बचत खात्यात जमा करण्यात येणार आहे. याबाबतचा निर्णय संचालक मंडळाच्या बैठकित एकमताने घेण्यात आल्याची माहिती जिल्हा बँकेचे अध्यक्ष संजय पवार यांनी दिली.

जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाची बैठक नुकतीच पवार यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीतील निर्णयांबाबत माहिती देतांना पवार म्हणाले की, कर्जासाठी लागणारी २३६ रूपये प्रोसेसिंग फि रद्द करावी अशी शेतकऱ्यांची मागणी होती. त्याबाबत बैठकित चर्चा होऊन ही फी रद्द करण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला.

Jalgaon DCC Bank
Nashik DCC Bank : दहा लाखांवर कर्ज थकलेल्या थकबाकीदारांवर कारवाई

कर्जाची रक्कम बचत खात्यात

जिल्हा बँकेतर्फे शेतकऱ्यांना कर्जाची रक्कम एटीएमद्वारे देण्यात येते. मात्र सद्यस्थितीत एटीएम कार्डची मुदत संपलेली आहे. नवीन कार्ड लवकरच वितरीत करण्यात येणार आहेत. या कालावधीत शेतकऱ्यांचे कर्ज त्यांच्या बचत खात्यात जमा करण्यात येईल. त्यांना बँकेतून स्लीपद्वारे ही रक्कम देण्यात येईल. या प्रस्तावालाही संचालकांनी एकमताने मंजुरी दिली.

Jalgaon DCC Bank
Jalgaon DCC Bank : जिल्हा बँकेच्या संचालिका जनाबाई महाजन अपात्र घोषित

नवीन कर्मचाऱ्यांना पगारवाढ

जिल्हा बँकेत नुकतीच नवीन कर्मचारी भरती झाली आहे. त्यांना पगारवाढ देण्याचा प्रस्ताव होता. त्याबाबत माहिती देतांना पवार यांनी सांगितले कि पगारवाढ देण्याबाबतचा प्रस्ताव एकमताने मंजूर करण्यात आला.

जिल्ह्याबाहेरील संस्थांच्या कर्जाबाबत माहिती देताना पवार म्हणाले, की जिल्हाबाहेरील ज्या संस्थांना बँकेकडून कर्ज घ्यावयाचे असेल, त्यांना आता जिल्हा सहाय्यक निबंधक (सहकारी संस्था) यांचा ना हरकत दाखला घ्यावा लागणार आहे.

या प्रस्तावालाही एकमताने मंजूरी देण्यात आली. जळगाव येथील कुक्कम कंपनीने कर्ज मागणीचा प्रस्ताव दिला होता. त्याबाबत ते म्हणाले की, कंपनीने हा प्रस्ताव दिला होता. मात्र, त्यांनी मेलद्वारे हा प्रस्ताव मागे घेतल्याचे कळविले.

त्यामुळे तो प्रस्तावच रद्द करण्यात आला. या वेळी एकनाथ खडसे, आमदार डॉ. सतीश पाटील, गुलाबराव देवकर, शैलजा निकम, अनील पाटील, किशोर पाटील, महापौर जयश्री महाजन, ॲड. रविद्र पाटील, प्रताप हरी पाटील, घन:श्‍याम अग्रवाल, प्रदीप देशमुख आदी संचालक उपस्थित होते.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com