मौदा, जि. नागपूर : तालुक्यातील २५ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी ८७ उमेदवार सरपंच पदासाठी (Sarpanch) रिंगणात आहेत. तालुक्यातील सदस्यपदाच्या जागा २२१ सदस्यपदाच्या निवडणुकीत२९ अर्ज परत घेतले. त्यामुळे रिंगणात ५५७ अंतिम उमेदवार आहेत.
मौदा तालुक्यात २५ ग्रा.पं.च्या. निवडणुका होत आहेत. एवढ्या मोठ्या संख्येने होत असलेल्या निवडणुकीकडे सर्वच पक्षांचे नेते जि.प., विधानसभा निवडणुकीची रंगीत तालीम म्हणूनच पाहत आहेत. त्यामुळे काही ठिकाणी सोयीचे राजकारण करत सरपंचपदावर आपल्याच गटाचा उमेदवार निवडून येणार, यासाठी गावपातळीवर सर्व गटांना एकत्र करण्यावर भर दिला आहे. महाविकास आघाडीने थेट सरपंच निवडीचा मागच्या सरकारने घेतलेला निर्णय रद्द केला होता.
मौदा तालुक्यात २५ ग्रा.पं.च्या निवडणुका होत आहेत. त्यामुळे जे इच्छुक विधानसभेची तयारी करत आहेत. त्यांच्यासाठी ही रंगीत तालीमच ठरणार आहे. त्यामुळे या निवडणुकीत अक्षरशः जीव ओतून काम करा, अशा सूचना गावपातळीवरील पुढाऱ्यांना नेत्यांनी दिल्या आहेत. त्यामुळे या वर्षीच्या निवडणुकांमध्ये चुरस अधिकच पाहायला मिळत आहे. आगामी काळात पं.स., जि.प. त्याचबरोबर विधानसभा निवडणुकाही होण्याची दाट शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर या निवडणुकांसाठी इच्छुक असलेल्यांनी सरपंचपदासाठी वाटेल ते करण्याची तयारी ठेवली आहे. त्यासाठी मग पं.स., जि.प. तसेच विधानसभा निवडणुकीत एकमेकांचे कट्टर विरोधक असलेल्यांनी गावपातळीवर कट्टर विरोधी कार्यकर्त्यांना मात्र एकत्र येण्यास भाग पाडले आहे. त्यातून काही ठिकाणी नाराजीचा सूर उमटू लागला आहे.
सरपंचपदाला आले महत्त्व
थेट जनतेतून सरपंच निवडीला महाविकास आघाडी सरकारने स्थगिती दिली होती. नव्याने सरकार आल्यानंतर पुन्हा त्याला परवानगी दिली आहे. त्यामुळे आता सरपंचपदावर डोळा ठेवून आपल्या गटाचा सरपंच होण्यासाठी नेत्यांनी स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांना तडजोडीची भूमिका घेण्यास भाग पाडले आहे. त्या मोबदल्यात सदस्यपदाच्या एक-दोन जागा वाढवून देण्याची तयारी ठेवली आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.