इंधन दरवाढीविरोधात श्रीरामपुरात ‘लाँग मार्च

काँग्रेसच्या वतीने महागाईमुक्त भारत अभियानांतर्गत लाँग मार्च
fuel price
fuel priceAgrowon

नगर : ‘‘केंद्रातील भाजप सरकार (Bjp Government) हे भांडवलदारधार्जिणे आहे. श्रम करून घाम गळणाऱ्यांचे श्रम चोरणारे आहे. पेट्रोल-डिझेल (Petrol Disel) दराचे रोज नवे उच्चांक होत आहेत. उज्ज्वला गॅस योजनेचा पुरता बोजवारा उडाला आहे. महागाईने (Inflation) जनता त्रस्त झाली आहे’’, असा घणाघात काँग्रेसचे आमदार लहू कानडे यांनी केला.

fuel price
इंधन दरवाढीविरोधात राज्यभरात ‘भडका’ 

काँग्रेसच्या वतीने महागाईमुक्त भारत अभियानांतर्गत आमदार कानडे यांच्या यशोधन कार्यालयापासून ‘लाँग मार्च’ काढण्यात आला. शिवाजी रस्त्याने जाऊन तहसील कार्यालयासमोर (Tehsil office) मार्चचे सभेत रूपांतर झाले. या वेळी इंद्रनाथ थोरात, अरुण नाईक, अंजूम शेख, ज्ञानेश्‍वर मुरकुटे, बाळासाहेब चव्हाण, रवींद्र गुलाटी, राजेश अलघ, अंकुश कानडे, अशोक कानडे, अशोक बागूल, सुभाष तोरणे, किशोर बकाल, प्रताप देवरे, समीन बागवान, अप्सरा शेख आदी उपस्थित होते. या वेळी तहसीलदार प्रशांत पाटील, पोलिस निरीक्षक संजय सानप यांना निवेदन देण्यात आले.

आमदार कानडे म्हणाले, ‘‘मोदी (Modi) यांचे मित्र अदानी जगातील दहा श्रीमंतांच्या यादीत जाऊन बसले. गोरगरीब जनतेवर भाववाढीचा बोजा लादायचा, त्याचबरोबर त्यांचा घाम गाळून मिळवलेला पैसा ओरबाडायचा आणि भांडवलदार मित्राची भरभराट होण्यासाठी मदत करायची ही नीती आहे. काँग्रेस (Congress) पक्षाची उज्ज्वल परंपरा रचनात्मक आणि विकासात्मक काम करण्याची आहे. गरिबाला जगविण्यासाठी अनेक कल्याणकारी योजना पक्षाने आखून गोरगरिबांचे कल्याण साधले. आता ही विचारधारा बळकट करण्याचे आव्हान आपल्यासमोर आहे.’’

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com