Sugarcane Harvesting : ऊसतोडणीसाठी मजुरांकडून उत्पादक शेतकऱ्यांची लूट

ऊसगाळप हंगाम वेगात सुरू असून, ऊस वेळेत तुटावा यासाठी शेतकऱ्यांकडून प्रयत्न सुरू आहे.
Sugarcane Harvesting
Sugarcane HarvestingAgrowon

Sugarcane Harvesting सातारा ः ऊसगाळप हंगाम (Sugarcane Season) वेगात सुरू असून, ऊस वेळेत तुटावा (Sugarcane Harvesting) यासाठी शेतकऱ्यांकडून प्रयत्न सुरू आहे. या अडचणीचा फायदा घेत ऊसतोड मजूर (Sugarcane Labor) तसेच तोडणी यंत्रचालकांकडून (Sugarcane Harvester) एकरी पाच ते सहा हजार रुपये घेण्याचा प्रकार राजरोस सुरू आहेत.

Sugarcane Harvesting
Sugarcane Harvester : ऊसतोडणीसाठी ९०० हार्वेस्टरकरिता मदत करू

जिल्ह्यात महाबळेश्‍वर तालुका वगळता सर्वच तालुक्यांत उसाचे पीक घेतले जात आहे. उसाचे क्षेत्र वाढत जाईल त्याच प्रमाणात जिल्ह्यातील कारखान्यांच्या संख्येत वाढ होत गेली आहे. सध्या १६ कारखान्यांकडून उसाचे गाळप सुरू आहे.

माण, खटाव तालुक्यांतही उसाचे क्षेत्र लक्षणीय वाढले आहे. यामुळे जिल्ह्यात उसाच्या क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. आडसाली उसाचे क्षेत्र वाढ झाल्याने अनेक कारखान्यांचे गाळपाचे गणित चुकले आहे.

Sugarcane Harvesting
Sugarcane Harvester : हार्वेस्टर वाढविल्याशिवाय साखर कारखान्यांना पर्याय नाही

अजून अनेक कारखान्यांची आडसाली ऊसतोडणी सुरू आहे. यामुळे पूर्व व सुरू हंगामातील उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात शिल्लक आहे. उन्हाची तीव्रता वाढत असल्याने पाण्याची टंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत.

तसेच मार्च महिन्याच्या अगोदर ऊस गेल्यावर पीककर्ज नवेजुने करण्यास मदत होत असल्याने मार्च महिन्याच्या अगोदर ऊस तुटून बिले जमा व्हावी, असा शेतकऱ्यांचा प्रयत्न असतो.

यामुळे ऊस लवकर तुटावा यासाठी शेतकऱ्यांकडून प्रयत्न केले जात आहे. याचा फायदा ऊसतोड मजूर, तसेच यंत्रचालकाकडून घेतला जात आहे. एकरी पाच ते सहा हजार रुपये ट्रॅक्टरचालकाकडून प्रत्येक ट्रिपला शंभर ते दीडशे रुपये घेतले जात आहे.

ऊस तुटावा यासाठी नाइलाजास्तव शेतकऱ्यांकडून पैसे द्यावे लागत आहेत. हे प्रकार राजरोसपणे सुरू असतानाही कारखाना व्यवस्थापन व कर्मचाऱ्यांकडून दुर्लक्ष केले जाते.

तोडणीसाठी मजुरांनी घेतलेली उचल रक्कम बऱ्यापैकी कमी झाली असल्याने कामगार निघून जाण्याची भीती असल्याने तक्रार झाली, तरी कारवाई करता येत नसल्यामुळे शेतकऱ्यांची लूट सुरूच राहते.

उशिरा तुटलेल्या उसाचे उत्पादनही अपेक्षित येत नसतानाही क्षेत्रावर आकारावर पैसे घेतले जात असल्याने शिल्लक तुटपुंजी राहत आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com