Cotton Crop Damage : हाती आलेला कापूस वाया जातोय

महिनाभर झाले सारखा पाऊस कोसळतोय. कापसाच्या पिकाची पुरती वाट लागत आहे. फुटलेल्या कापसाच्या वेचणी करता येत नसल्याने डोळ्या देखत वाती होत आहेत.
Cotton Crop Damage
Cotton Crop DamageAgrowon

नगर : महिनाभर झाले सारखा पाऊस (Heavy Rain) कोसळतोय. कापसाच्या पिकाची पुरती वाट (Cotton Crop Damage) लागत आहे. फुटलेल्या कापसाच्या वेचणी (Cotton Picking) करता येत नसल्याने डोळ्या देखत वाती होत आहेत. आता पाऊस थांबला नाही तर, राहिलेला कापूसही वाया जातो की काय ही चिंता जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सतावतेय...

Cotton Crop Damage
Crop Damage Compensation : एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये

राज्यात कापसाचे साधारण ४५ लाख हेक्टर क्षेत्र आहे. नगर जिल्ह्यातही बऱ्यापैकी कापसाचे पीक रुजले आहे. साधारणपणे जून-जुलैमध्ये लागवड झालेल्या कापसाचे ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यात वेचणी होते; मात्र गेल्या तीन वर्षांपासून सातत्याने परतीच्या पावसामुळे कापसाचे पीक अडचणीत आहे. ज्या भागात कापसाचे पीक अधिक आहे, त्याच भागात परतीचा पाऊसही काही दिवसांपासून जोरदार आहे. दहा-बारा दिवसांपासून अतिवृष्टी, ढगफुटीसदृश पाऊस पडत असल्याने त्याचा मोठा फटका कापूस पिकाला बसला आहे.

Cotton Crop Damage
Kharif Crop Damage : खरिपाचे नुकसान; रब्बी हंगामही अडचणीत

जिल्ह्यातील शेवगाव, पाथर्डी, जामखेड, राहुरी, नेवासा, राहता, पारनेर, कोपरगाव तालुक्यांत कापूस पीक घेतले जाते. शेवगाव, नेवासा, पाथर्डी तालुक्यांत सर्वाधिक क्षेत्र आहे. पावसामुळे या भागातील कापूस उत्पादकांनी हातबलता व्यक्त करत आहेत. गेले पंधरा दिवस सातत्याने पाऊस पडत आहे. पाण्याचा निचरा होत नसल्याने शेतात पाणी साठवून राहात असून वेचणीला आलेला कापूस भिजला आहे, झाडे पडत असून पीक वाया जाण्याची भीती आहे.

सर्वाधिक कापूस लागवडीचा पट्टा असलेल्या शेवगाव तालुक्यातील भातकुडगाव, भायगाव, बक्तरपुर, मजलेशहर, देवटाकळी, शहरटाकळी, मठाचीवाडी, ढोरसडे, भावीनिमगाव, रांजणी, दहिगावने अतिवृष्टीने कापसाचे वाताहात गेली आहे. बोधेगाव, चापडगाव, बालमटाकळी, सोनोशी भागातील शेतकऱ्यांनीही कापसाच्या नुकसानी बाबत हतबलता व्यक्त केली.

नगदी पीक म्हणून कापसाची लागवड करतो; मात्र अलिकडे परतीच्या पावसाने  सातत्याने कापसाचे नुकसान होत आहे. यंदा अतिवृष्टीने कापसाची मोठी हानी झालीय. फुटलेला कापूस वेचणी करता येत नाही. आता पाऊस थांबला पाहिजे.-
संदीप राऊत, शेतकरी, शहरटाकळी
दिवाळीला कापसाचा आधार मिळत असतो. यंदा पावसाने वेचणी करता आली नाही. झाडाचेही नुकसान होतेय. कापूस भिजल्याने त्याचा दर्जा कमी होतोय. शासन, लोकप्रतिनिधी लक्ष देत नाहीत, निसर्गही कोपतोय. शेतकऱ्यांवर दुर्दैवी वेळ आलीय.
रवींद्र बांगर, शेतकरी, भावीनिमगाव

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com