Agriculture Pump : कृषिपंप चोऱ्यांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान

गोदरच इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागात पावसाने उशिरा हजेरी लावली. त्यामुळे भात रोपे व भाजीपाला पिकांना सिंचन करावे लागत होते, त्यातच आता या चोऱ्यांमुळे ‘दुष्काळात तेरावा महिना’ असे म्हणण्याची वेळ आली आहे.
Agricultural pump
Agricultural pumpAgrowon

नाशिक : एकीकडे शेतकरी पदरमोड करून शेती साहित्याची (Agriculture Inputs) खरेदी करतात. त्यात सध्या शेतीमालाला अपेक्षीत दर नसताना शेतकरी हवालदिल आहे. इगतपुरी तालुक्यांतील शेतकरी विहिरीतील आहे त्या उपलब्ध पाण्यावर थोडीफार पिके व भात रोपे तयार करत आहेत; मात्र अशा परिस्थितीत तालुक्यातील खेडभैरव येथे चोरट्यांनी कृषिपंप चोरून (Agriculture Pump Theft) नेल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचा प्रकार समोर आला आहे. बुधवारी (ता. २२) एका रात्रीतून जवळपास ७ ते ८ कृषिपंप चोरी गेल्याने खळबळ उडाली. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर ऐन खरिपात अडचणी वाढल्या आहेत.

अगोदरच इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागात पावसाने उशिरा हजेरी लावली. त्यामुळे भात रोपे व भाजीपाला पिकांना सिंचन करावे लागत होते, त्यातच आता या चोऱ्यांमुळे ‘दुष्काळात तेरावा महिना’ असे म्हणण्याची वेळ आली आहे. येथील शेतकरी सुनील वाजे, रामदास वाजे, रामकृष्ण वाजे, नंदू वाजे, बाळू वाजे व भीमा चव्हाण या शेतकऱ्यांचे कृषिपंप इलेक्ट्रिक स्टार्टरसह चोरी गेल्याने शेतकऱ्यांनी पोलिसांत धाव घेतली आहे.

चोरीच्या घटना वाढत असल्याने या घटनेची चौकशी करून चोरट्यांना अटक करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. यामध्ये सराईत गुन्हेगार असल्याची शंका शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. यानुसार आता पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आला आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com