Crop Damage : अमरावती जिल्ह्यातील ३१ टक्के क्षेत्रातील खरीप बुडाला

जुलै व ऑगस्ट महिन्यातील दहा दिवसांतील अतिवृष्टीने जिल्ह्यातील खरीप हंगाम बुडाला आहे. या पावसाने जिल्ह्यातील जवळपास दोन लाख हेक्टर क्षेत्रातील खरिपाची पिके नष्ट झाली असून, एकूण पेरणी क्षेत्राच्या ते ३१ टक्के आहे.
Crop Damage
Crop DamageAgrowon

अमरावती : जुलै व ऑगस्ट महिन्यातील दहा दिवसांतील अतिवृष्टीने (Heavy Rain) जिल्ह्यातील खरीप हंगाम () बुडाला आहे. या पावसाने जिल्ह्यातील जवळपास दोन लाख हेक्टर क्षेत्रातील खरिपाची (Kharif Season Loss) पिके नष्ट (Crop Damage) झाली असून, एकूण पेरणी क्षेत्राच्या (Sowing Acreage) ते ३१ टक्के आहे. जिल्हा प्रशासनाने १ लाख ८१ हजार हेक्टर क्षेत्राचे पंचनामे उरकले आहेत. राज्य सरकारने नुकसान भरपाई जाहीर केली असली तरी उत्पादनाची सरासरी व हमी दर यांच्या तुलनेत ही भरपाई किती पुरेशी आहे, असा प्रश्‍न शेतकऱ्यांना पडला आहे.

Crop Damage
Crop Damage : ऑगस्ट महिन्यातील अतिवृष्टीचा ५ हजार हेक्टरला फटका

जिल्ह्यात एकूण ६ लाख ९९ हजार २९९ हेक्टर सरासरी क्षेत्रापैकी ६ लाख ३८ हजार ९३४ हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली आहे. गतवर्षीच्या हंगामात सोयाबीन व कापसाला उच्चांकी दर मिळाल्याने यंदाही शेतकऱ्यांच्या अपेक्षा उंचावल्या होत्या. जिल्ह्यात २ लाख ४७ हजार हेक्टरमध्ये सोयाबीन, तर २ लाख ४५ हजार हेक्टरमध्ये कापसाची पेरणी झाली आहे. तर तुरीखाली १ लाख ७ हजार, मुगाखाली ७,४१७ व उडदाखाली १,७०० हेक्टर क्षेत्र आले आहे.

Crop Damage
Crop Damage : पिकातील अतिरीक्त पाणी बाहेर कसे काढाल?

जुलै महिन्यातील ५, १०, १८, १९, २४ व २५ या चार दिवसातील अतिवृष्टीने १ लाख ९६ हजार हेक्टरमधील पिके नष्ट झाल्याचा प्राथमिक अहवाल जिल्हा प्रशासनाने दिला आहे. यापैकी ९२ टक्के क्षेत्राचे पंचनामे झाले असतानाच ७ ते १० ऑगस्टपर्यंत झालेल्या अतिवृष्टीने नुकसानग्रस्त क्षेत्राचा आकडा दोन लाखांवर पोहोचविला आहे. सोयाबीन, कापूस, तूर या मुख्य पिकांसह इतर पिके व फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. राज्य सरकारने नुकसानग्रस्तांना तीन हेक्टरच्या मर्यादेत हेक्टरी १३ हजार ६०० रुपये मदत कोरडवाहूसाठी घोषित केली आहे. यंदा जाहीर झालेले हमी दर बघता सरकारची मदत किती सहायक ठरू शकेल, असा प्रश्‍न विचारण्यात येऊ लागला आहे.

सरकारची मदत किती सहायक ठरणार?

कोरडवाहू शेतीत सोयाबीन साधारणतः एकरी तीन ते चार क्विंटलचे उत्पादन होते. यंदा ४,३०० रुपये हमीदर आहेत. एक एकर शेतीधारकास चार क्विंटलच्या सरासरीने १७ हजार २०० रुपयांचे उत्पादन होत असताना शासकीय मदत मात्र साडेपाच हजारांच्या जवळपास मिळणार आहे. असाच प्रकार कापसाच्या व इतर पिकांच्या शेतकऱ्यांसंदर्भात होणार आहे. या मदतीतून त्याचा पेरणी आणि मशागतीचा खर्च तरी निघेल का, असा प्रश्‍न विचारला जात आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com